राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत 66 हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत या उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा स्थगित करण्यात आली आहे. या निवडींमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत राज्य निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे.
राजभरातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच जवळपास 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी महायुतीचे म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आहेत.इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर कोणताही दबाव टाकून, आमिष दाखवून किंवा जबरदस्ती करून त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले आहे का, याची तपासणी केली जाईल
आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश
निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही आणि अहवाल सादर केला जात नाही, तोपर्यंत संबंधित उमेदवारांना अधिकृतपणे 'विजयी' घोषित करू नका, असे आदेश आयोगाने दिले आहेत. ही चौकशी पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जर चौकशीत काही गैरप्रकार आढळले, तर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक
पुणेभाजप- 2पिंपरी चिंचवडभाजप- 2पनवेलअपक्ष- 1भाजप- 6ठाणेशिवसेना (शिंदे गट)- 7भिवंडीभाजप- 6कल्याण-डोंबिवलीभाजप- 14शिवसेना (शिंदे गट)- 6धुळेभाजप- 4मालेगावइस्लामिक पार्टी- 1जळगावभाजप- 6शिवसेना (शिंदे गट)- 6अहिल्यानगरभाजप- 3राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 2
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.