Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली:- विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, देवेंद्र फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात

सांगली:- विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, देवेंद्र फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात


सांगलीच्या शुद्ध पाण्यासाठी 454 कोटींच्या वारणा उद्भव योजनेला मान्यता देणार आहे. पुराचे पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी 591 कोटींच्या कामांना मंजुरी देणार आहे. सांगली महापालिकेच्या सुसज्ज इमारतीसाठी निधी देऊ. जागा उपलब्ध करून दिल्यास कवलापूर विमानतळाचा प्रश्न अहवाल घेऊन मार्गी लावू. ट्रक टर्मिनल प्रलंबित प्रश्नही सोडवू, मिरजेत म्युझिक हेरिटेज पार्क करण्याच्या प्रस्तावावर विचार करू, अशा आश्वासनांची खैरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतून केली. सांगली महापालिकेसाठी 100 कोटींचे रस्ते, 105 कोटींच्या पाणी योजना, 253 कोटींची ड्रेनेज योजना, 89 कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरातील एलईडी लाईट साठी 60 कोटी, शंभर फुटी रस्ता व काळी खण विकासासाठी 18 कोटी दिला असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

शहरातील कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही

त्यांनी सांगितले की, महापालिका इमारत जुनी झाली आहे. भाजपचा झेंडा महापालिकावर लागला की महापालिकेच्या नवीन इमारतीला मंजुरी देऊ, सांगली महापालिका भाजपकडे द्या, शहरातील कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. मिरजमध्ये म्युझियम उभारू, आमचे व्हिजन हे एक दोन वर्षाचे नाही, तर कायमस्वरूपी असलेले विकासाचे व्हिजन आहे. झोपडपट्टी भाग नियमित करून देऊ, कच्चे घर पक्के बनवून देऊ.

सांगली, कोल्हापूरच्या पुरावर कायमस्वरूपी उपाय काढला
फडणवीस म्हणाले की, आज प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून करतोय याचा आनंद आहे. एकदा मोदी म्हणाले, सांगली चांगली म्हणून आज भाजप पक्षाचा प्रचार शुभारंभ सांगलीमधून करत आहे. मागे सभा घेतल्यावर काही आश्वासन दिली होती, विकास करून दाखवा असं म्हटलं होतं. जी जी आश्वासन दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. सांगली, कोल्हापूरच्या पुरावर वर्ल्ड बँकेच्या मदतीने कायमस्वरूपी उपाय काढला. 591 कोटी रुपये यासाठी उपलब्ध करून दिले. ते म्हणाले की, वाहून जाणारे पाणी शहरात न येता दुष्काळी भागाकडे आणि मराठवाडाकडे वळवू. ते म्हणाले की, देशाची वाटचाल 70 वर्ष एकच भूमिका होती भारत हा गावात राहतो, गावचा विकास म्हणजे देशाचा विकास, पण शहर आहेत हे आपण विसरलो, आज शहराच्या गरजा वाढत आहेत. 70 वर्ष आपण शहरासाठी काहीच केलं नाही. देशाचा 65 टक्के जोडीपी शहरात राहतो असे मोदींनी सांगून शहराच्या विकासाच्या योजना आखल्या. कोट्यवधी रुपये या शहरासाठी आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.