पाच लाख रुपये द्या नाहीतर तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी एका ड्रायव्हरने आपल्या मालकिणीला दिल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनौमधील राजाजीपुरम येथे घडली आहे. आपल्याकडे काम करणाऱ्या माजी ड्रायव्हरने अश्लील फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा, चोरी केल्याचा आणी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच आरोपी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करीत आहे, अशी तक्रारही या महिलेने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी हनुमान सिंह हा गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. यानिमित्ताने आरोपीचं-घरीही येणं जाणं सुरू झालं. आरोपीने वेतनाशिवाय त्याच्या आईच्या आजारपणात उपचारांसाठी ५ लाख रुपये उधार घेतले होते. तसेच थोडे-थोडे करून हे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. काही काळापूर्वी मात्र तो नोकरीवरून अचानक फरार झाला.पीडितेने आरोपी गायब झाल्यानंतर घरातील सामानाची तपासणी केली. तेव्हा सोन्याचे काही दागिने आणि सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचं दिसून आलं. ही चोरीसुद्धा या ड्रायव्हरनेच केली असावी, असा पीडितेला संशय आहे. त्यानंतर आरोपी ड्रायव्हरने महिलेला फोन करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ आहेत. जर तुम्ही ५ लाख रुपये दिले नाहीत तर मी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने दिल्याचे पीडित महिलेने सांगितले. तसेच त्याने जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर पीडितेने कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.