महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला. पुणे- पिंपरी चिंचवड हे बालेकिल्ले असलेल्याच शहरांमध्ये भाजपने पवार काका- पुतण्यांना धोबीपछाड देत पुण्याचे कारभारी बदलण्याचा पराक्रम केला. या मोठ्या पराभवानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.
आगामी निवडणुका एकत्र लढणार
बारामतीत आज कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार, जयंत पाटील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंनी आगामी निवडणुका एकत्र लढत असल्याचे स्पष्ट केले आहे.येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे सांगत महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असं शशिकांत शिंदे म्हणाले.
पवार कुटुंब एकत्र...!
बारामती मध्ये कृषीक 2026 चे कृषी प्रात्यक्षिकावर आधारित कृषी प्रदर्शन पार पडत आहे 17 ते 24 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन पार पाडणार आहे. याचा उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडल आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा बारामतीत पवार कुटुंब एकत्र आल्याच पाहायला मिळाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.