भारत टॅक्सी सेवा आजपासून सुरू, किती किमीपर्यंतच्या प्रवासासाठी किती भाडे द्यावे लागेल? वाचा सविस्तर...
वर्षाची सुरूवात मोठ्या उत्साहात झाली. नवीन वर्षामध्ये अनेक नियमांमध्ये बदल झाले. तर भारत सरकारने अनेक सेनवा देखील सुरू केल्या आहेत. नवीन वर्षासोबत देशात 'भारत टॅक्सी' ही नवीन कॅब सेवा देखील आजपासून सुरू करण्यात आली. सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने चालवण्यात येणारी भारत टॅक्सी ही सेवा फक्त कॅब चालकांचे उत्पन्न वाढवणार नाही तर प्रवाशांची ओला-उबरच्या मनमानी नियमातून सुटका देखील होईल.
भारत टॅक्सी कॅब चालकांना पूर्ण मालकी हक्क देईल. कारण या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना ओला-उबरला मोठे कमिशन द्यावे लागणार नाही आणि या कंपन्या त्यांच्या कामात हस्तक्षेप करू शकणार नाहीत. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, नोएडा आणि गुरुग्राम यासारख्या शहरांमध्ये भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि चालकांना भारत टॅक्सीचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
भारत टॅक्सी हे कॅब चालकांसाठी शून्य-कमिशन प्लॅटफॉर्म असणार आहे. म्हणजे जेव्हा एखादा प्रवासी त्यांचे भाडे भरतो तेव्हा संपूर्ण रक्कम थेट चालकाच्या खिशात जाईल आणि चालकांना कंपनीला कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही. जेव्हा सर्व भाडे पैसे चालकाच्या खिशात जाईल तेव्हा प्रवाशांचा प्रवास खर्च कमी होईल. महत्वाचे म्हणजे, गर्दीच्या वेळा, पाऊस आणि वाहतुकीच्या नावाखाली ओला आणि उबरने लादलेल्या मनमानी शुल्कापासून प्रवाशांची सुटका होईल.भारत टॅक्सी निश्चित किंमत पद्धतीवर काम करेल. म्हणजे तुमच्या प्रवासाची परिस्थिती काहीही असो तुम्हाला फक्त प्रवास केलेल्या अंतरासाठीचेच भाडे द्यावे लागेल. गर्दीच्या वेळी, पाऊस आणि वाहतुकीच्या वेळी वाढीव किंमतीच्या बहाण्याने इतर खासगी कंपन्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत अचानक भाडे मोठ्या प्रमाणात वाढवत होते. तसे भारत टॅक्सीद्वारे प्रवास करताना होणार नाही. प्रवाशांना फक्त त्यांच्या प्रवासाच्या अंतराचेच पैसे भरावे लागतील.
लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या एका वृत्तानुसार, भारत टॅक्सी अॅपवर पहिल्या ४ किमीच्या प्रवासासाठी ३० रुपये फिक्स भाडे असेल. ४ किमीनंतर आणि १२ किमीपर्यंत प्रत्येक किमीसाठी भाडे २३ रुपये असेल. १२ किमीपेक्षा जास्त प्रवास करण्यासाठी प्रत्येक किमीसाठी भाडे १८ रुपये असेल. पैशाचे गणित समजून घेण्यासाठी, जर तुम्हाला १२ किमी प्रवास करायचा असेल तर पहिल्या ४ किमीचे भाडे ३० रुपये फिक्स असेल आणि नंतर ५ व्या किमी ते १२ व्या किमी म्हणजे ८ किमीपर्यंत २३ रुपये भाडे असेल. जे १८४ रुपये असेल. आता, ३० आणि १८४ रुपये एकत्र केल्यास तुमच्या १२ किमीच्या प्रवासाचे एकूण भाडे २१४ रुपये होईल.
.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.