Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किती धाडस, मुलीने थेट आईला दाखवला बॉयफ्रेंडसोबतचा तो फोटो, बघताच आई घाबरली अन्..

किती धाडस, मुलीने थेट आईला दाखवला बॉयफ्रेंडसोबतचा तो फोटो, बघताच आई घाबरली अन्..


सध्या सोशल मीडियावर हटके, हसवणारे आणि तणाव विसरायला लावणारे कंटेंट प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः घरातील आई-मुलींचे गमतीशीर क्षण असलेले व्हिडीओ नेटकऱ्यांच्या मनाला लगेच भिडतात. असाच एक मजेशीर आणि हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो पाहून लाखो लोक खळखळून हसत आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील पावनी अवस्थी या तरुणीने आपल्या आईसोबत केलेला हा निरागस प्रॅक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या प्रॅकमध्ये तिने AI  तंत्रज्ञानाचा अनोखा वापर केला आहे.


AI-जनरेटेड फोटो आणि 'बॉयफ्रेंड'चा दावा
हा व्हायरल व्हिडीओ एका साध्या पण भन्नाट कल्पनेवर आधारित आहे. पावनीने ChatGPT च्या मदतीने एक AI-जनरेटेड फोटो तयार केला. या फोटोमध्ये ती एका अनोळखी तरुणाच्या अगदी जवळ उभी असल्याचे दिसते. हाच फोटो तिने आपल्या आईला मोबाईलवर दाखवत अगदी सहजपणे, मम्मा, हा माझा बॉयफ्रेंड आहे असे सांगितले. 

इतक्यातच घरात वातावरण बदलते आणि खरी मजा सुरू झाली. भारतीय आई हा फोटो पाहताच अॅक्शन मोडमध्ये आली. व्हिडीओमध्ये पावनी शांतपणे फोटो दाखवताना दिसते. मात्र फोटो पाहताच तिच्या आईचा पारा चढतो. अगदी सर्वसाधारण भारतीय आईप्रमाणेच तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. ती म्हणते की, अरे, कुणी पाहिलं तर आपली इज्जत जाईल. हा मुलगा कोण आहे? इतकी जवळ उभी का आहेस? पप्पांनी पाहिलं तर काय होईल? असे एकामागोमाग प्रश्न पडतात.

पावनी मात्र अगदी गंभीर चेहऱ्याने उत्तर देत राहते. इतकेच नाही तर ती गंमतीने म्हणते, तो लवकरच घरी येणार आहे. हे ऐकताच आई अधिकच गंभीर होते. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य, काळजी आणि भीती पाहून प्रेक्षकांना हसू आवरता येत नाही. काही वेळानंतर पावनी आईला सांगते की हा सगळा प्रकार फक्त एक प्रॅक आहे आणि दाखवलेला फोटो AI ने तयार केलेला आहे. हे समजताच आई सुटकेचा निःश्वास सोडते आणि तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटते.


लाखो व्ह्यूज आणि मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडीओ आतापर्यंत 35 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. कमेंट्समध्येही विनोदांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.