आजच्या काळात मानवी समाज अनेक प्रकारच्या संकुचितता,शंभूनाथ तिवारी
सकारात्मक मतभेद आणि संकीर्ण विचारांत विभागलेला दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर मानवतेची वीण अधिक घट्ट करत माणसाच्या विचारांची कक्षा व्यापक करणे आणि आत्मपरीक्षणातून सकार स्वसुधाराची जाणीव निर्माण करणे, यासाठी संत निरंकारी मिशन अखंडपणे प्रयत्नशील आहे. याच भूमिकेतून 'आत्ममंथन' या विषयासह महाराष्ट्राचा ५९वा वार्षिक निरंकारी संत समागम येत्या २४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित करण्यात येत आहे.
सुमारे ३२० एकरांच्या विशाल परिसरात होणाऱ्या या भव्य संत समागमात देश-विदेशातून लाखो श्रद्धाळू, भक्तगण तसेच सर्व स्तरांतील नागरिक सहभागी होणार आहेत. जे श्रद्धाळू प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी या संत समागमाचे थेट प्रक्षेपण संत निरंकारी मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावरून जगभर करण्यात येणार आहे, ज्यामुळे हा आध्यात्मिक संदेश जागतिक पातळीवर पोहोचेल. या विराट आयोजनाच्या सर्व व्यवस्था सद्गुरु माताजींच्या निर्देशानुसार, मिशनच्या सेवादल आणि स्वयंसेवकांकडून २८ डिसेंबर २०२५ पासून अत्यंत सुव्यवस्थित, शिस्तबद्ध आणि सातत्याने राबविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र निरंकारी संत समागम कमिटीचे चेअरमन श्री. शंभुनाथ तिवारी यांनी माहिती देताना सांगितले की, लंगर सेवा (महाप्रसाद), आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, पार्किंग, सहाय्यता केंद्रे व कँटीन यांसह सर्व मूलभूत सुविधांचे संचालन करण्यासाठी संत निरंकारी सेवादलाचे सुमारे 30 हजारांहून अधिक सेवादल पूर्ण समर्पण व सेवाभावाने आपली सेवा अर्पण करीत आहेत.
संत समागमाच्या तिन्ही दिवशी दुपारी २.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत मुख्य सत्संग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध श्रद्धाळू आपले प्रेरणादायी विचार मांडतील, तर समर्पित संत कलाकारांच्या भक्तीमय संगीत सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक उंची गाठेल. या सत्संगात सर्व वयोगटांतील आणि विविध भाषिक पार्श्वभूमीतील श्रद्धाळूचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही 'कवी दरबार' हे समागमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. दररोजच्या सत्संगाचा समारोप सद्गुरुंच्या प्रेरणादायी प्रवचनांनी होईल, ज्यामुळे आत्ममंथनाची भावना अधिक सदृढ होईल.
या निरंकारी संत समागमाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे संत निरंकारी मिशनच्या श्रद्धाळूनी साकारलेली भव्य प्रदर्शनी असून, त्यामध्ये मिशनचा इतिहास, तत्त्वज्ञान, आध्यात्मिक संदेश आणि सामाजिक उपक्रमांचे सजीव व प्रेरक चित्रण करण्यात आले आहे. तसेच मिशनच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेली सर्व आध्यात्मिक पुस्तके व मासिके सर्वांकरिता उपलब्ध असतील.
या भव्य आणि सुव्यवस्थित संत समागमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध प्रशासकीय यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. मानवी मनाची विचारसरणी आणि दृष्टी ज्ञान, विवेक व आत्मचिंतनाच्या माध्यमातून व्यापक करणाऱ्या या संत समागमात संत निरंकारी मिशन सर्व श्रद्धाळू व नागरिकांचे सादर स्वागत करीत आहे.
मुलीचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.