Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परीक्षा नाही थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास...

परीक्षा नाही थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास...

तरुण मंडळी त्यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर चांगल्या पोस्टची किंवा चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतात. चांगली पोस्ट आणि चांगला पगार म्हटंल की अनेकांना भीती वाटते ती मुलाखतीची. त्यामुळे लोक नोकऱ्यांच्या मुलाखतीला जाणं टाळतात.

पण केंद्र शासनाने अशाच तरुणांसाठी एक सगळ्यात मोठी संधी आणली आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुलाखत किंवा मोठ्या पदवीची आवश्यकता नाही.

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही भरतीची माहिती समोर आली आहे. यामध्ये २५,००० हजारांपेक्षा जास्त ग्रामीण डाक सेवकांची भरती करण्यात येणार आहे. जर तुम्हाला याचा अर्ज भरायचा असेल तर पुढील माहिती वाचावी लागेल.

सर्वप्रथम या कामासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. भारतीय पोस्ट ऑफिसने या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपुर्वीच प्रसिद्ध केली आहे. यासाठी तुम्हाला किमान १०वी पास असणे आवश्यक आहे. त्यांनाच हा अर्ज भरता येणार आहे.

अर्जाची सुरुवात ही २० जानेवारी २०२६ पासून झाली आहे. त्यासाठी कोणत्याही मुलाखतीची आवश्यकता नाही. याची निवड थेट करता येणार आहे. तुमच्या मार्कांच्या आधारे तुमची निवड केली जाईल. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही अर्ज प्रकिया थांबवण्यात येईल. त्यापुर्वीच इच्छुकांनी अर्ज करावा.

तुम्हाला नोकरीसाठी १० वा रिझल्ट लागणार आहे. तसेच तुमच्या गणिताच्या मार्कांना पाहिले जाणार आहे. तर भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला शिल्क भरावे लागतील. त्याची तारिख ५ फेब्रुवारी २०२६ रात्री ११ पर्यंत अशी असणार आहे. मेरिट लिस्ट होण्याची तारीख २० फेब्रुवारी असेल. तर याचे वेतन ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा १० हजार ते २९,४८० च्या दरम्यान असेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.