महिला पोलिसावर ७ वर्षे गँगरेप, ड्युटी असल्याचे सांगून हॉटेलवर न्यायचे अन् ड्रग्ज द्यायचे; वरिष्ठ अधिकाऱ्यासह सहकाऱ्यांवर आरोप
राजस्थानमध्ये महिला पोलिसावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह सहकाऱ्यांवर महिला पोलिसाने गंभीर आरोप केला. ड्युटीच्या बहाण्याने ७ वर्षे हॉटेलवर नेऊन तिच्यासोबत हे भंयकर कृत्य केले. हे प्रकरण २०१७ पासून सुरू झाले आणि ते २०२५ पर्यंत सुरू होते.
पीडित महिला पोलिसाने केलेल्या तक्रारीनुसार, २०१७ मध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने तिला फोन करून तिच्या कर्तव्याबद्दल खोटे सांगितले. ती पहाटे ३:३० वाजता ड्युटीवर आली तेव्हा आरोपी तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिला ड्रग्ज देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपी वारंवार या महिला पोलिसाला धमकी देत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत राहिले.
पीडित महिला पोलिसाने जिल्हा पोलिस अधीक्षक जय यादव यांची भेट घेत त्यांना तिच्यावर झालेला अत्याचाराची माहिती दिली. पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात आली आणि प्राथमिक निष्कर्ष समोर आल्यानंतर बुधवारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदार महिला कॉन्स्टेबलला गेल्या दोन महिन्यांपासून निलंबित करण्यात आले आहे. तिच्यावर गैरहजर राहण्याचा आणि अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हे प्रकरण सात वर्षे जुने आहे आणि पीडिता स्वतः वादात अडकली आहे. त्यामुळे प्रत्येक पैलूंची कसून चौकशी केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.