सांगलीत तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून निघृण खून शामरावनगर येथील घटना : हल्लेखोर पसार, कारण अस्पष्ट
सांगलीत तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून निघृण खून शामरावनगर येथील घटना हल्लेखोर पसार, कारण अस्पष्ट शहरातील शामरावनगर येथील मुख्य रस्त्यावर एका तरुणाचा कोयता, चाकू अशा धारदार शस्त्रांनी वार करत निघृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी सांगली शहर तसेच एलसीबीचे पथक दाखल झाले असून पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. तीन ते चार जणांनी हा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु असताना हा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
चेतन आप्पासाहेब तांदळे (वय 17, रा. गजानन कॉलनी, शामरावनगर सांगली) असे मृताचे नाव आहे. राहुल जाधव, सुजल वाघमोडे यांच्यासह दोन तीनजण संशयित आहेत. शुक्रवारी रात्री शंभर फुटी रस्त्यावरून शामरावनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मृत चेतन थांबला होता. त्यावेळी हल्लेखोर राहुल जाधव आणि त्याचे साथीदार तेथे आले. मृत चेतन याच्याशी त्यांनी किरकोळ कारणावरून वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यावर राहुल जाधव याच्यासह त्याच्या साथीदारांनी चेतनवर धारदार कुकरी, चाकूने हल्ला केला. त्याचा आरडा ओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा होऊ लागले. चेतन रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर नागरिक जमा होऊ लागल्याने हल्लेखोरांनी हत्यारे तेथेच टाकून पळ काढला. नागरिकांनी चेतनला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवले. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हा हल्ला इतका भयानक होता की मृत चेतनच्या पोटातील आतडी बाहेर आली होती.घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर, एलसीबीचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी आणि सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले. मुख्य संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार यातील मुख्य संशयित राहुल जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विटा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा तसेच बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल वापरल्याचा गुन्हा दाखल आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.