Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली 'कृष्णामाई महोत्सवा'ला उत्साहात प्रारंभ !

सांगली 'कृष्णामाई महोत्सवा'ला उत्साहात प्रारंभ !


सांगली:- येथील श्री कृष्णामाई महोत्सव समिती, महापालिका आणि श्री गणपति पंचायतन संस्थान यांच्या वतीने कृष्णामाई महोत्सवाला २७ जानेवारी या दिवशी उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण समारंभ झाला. सायंकाळी जलकलश पूजन आणि शोभायात्रा काढण्यात आली. हा महोत्सव ६ दिवस चालणार आहे. सरकारी घाटावरील श्री कृष्णामाई मंदिर परिसर आणि आयर्विन पुलालाही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने या महोत्सवाला काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने कृष्णा नदी काठावर विविध धार्मिक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी घाटावर सांगलीकरांनी सायंकाळी पहिल्याच्या दिवशी गर्दी केली होती. स्वामी समर्थ घाटावरही भगव्या रंगाच्या आकर्षक कमानी उभारल्या आहेत. २८ जानेवारी या दिवशी पूजा, रुद्राभिषेक, बिल्वार्चन, होमहवन, सप्तनदी जलकलश पूजन झाले, तर सायंकाळी शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, शिवपंचाक्षर स्तोत्र पठण, तसेच व्याख्यान झाले. त्यानंतर महाआरती होऊन कृष्णामाईला ६०० फूट साडी नेसवण्यात आली. रात्री गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे प्रवचन आणि 'स्वरसाधना ग्रुप'चा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या वेळी ह.भ.प. दीपक केळकर, ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा, माजी आमदार नितीन शिंदे, डॉ. नीळकंठ शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर महाराज, माजी जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, नितीन चौगुले, रवींद्र बेंडखळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.