Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोशल मीडिया, सीसीटीव्ही वरही कडक नजर; महापालिका निवडणुकीत कोणतीही अफवा खपवून घेतली जाणार नाही

सोशल मीडिया, सीसीटीव्ही वरही कडक नजर; महापालिका निवडणुकीत कोणतीही अफवा खपवून घेतली जाणार नाही


सांगली : भयमुक्त आणि उत्साही वातावरणात महापालिका निवडणूक पार पाडण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. महापालिका क्षेत्रात तब्बल १,२७९ पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रात्रंदिवस खडा पहारा ठेवण्यात येत आहे. सीसीटीव्ही व्हॅनद्वारे शहरभर गस्त सुरू आहे. याशिवाय ३१ संवेदनशील ठिकाणी 'फिक्स पॉईंट' उभारण्यात आले आहेत. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून पोलिस दल 'अलर्ट मोड'वर आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आढावा बैठकाही घेतल्या जात आहेत.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रेकॉर्डवरील दीड हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच चार टोळ्यांतील १८ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका उमेदवाराचाही समावेश आहे. उमेदवारी दाखल केलेल्या गुन्हेगारांचीही छाननी करण्यात आली आहे. 

महापालिका क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी सुमारे साडेचारशे पोलिस कर्मचारी व सातशे होमगार्ड कार्यरत आहेत. सांगली, मिरज व कुपवाड शहरांतील ३१ संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट उभारून पोलिस छावण्या तैनात केल्या आहेत.

त्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ हस्तक्षेप केला जाणार आहे. तिन्ही शहरांत सीसीटीव्ही व्हॅनची गस्त सुरू असून, संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक घुगे यांनी दिला.
सांगली व मिरज शहरांत दोन दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली असून, राखीव दलाच्या तुकड्याही दाखल झाल्या आहेत. तब्बल बाराशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त उभारण्यात आला आहे. आज पोलिस अधीक्षकांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला असून, उद्यापासून तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहणार आहे. सांगली व मिरज उपविभागीय स्तरांवरही विविध विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

असा असेल बंदोबस्त
पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक (७), निरीक्षक (२६), सहाय्‍यक निरीक्षक व उपनिरीक्षक (६४), अंमलदार (४१५), होमगार्ड (७००), राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दल व सीसीटीव्ही व्हॅन, असा व्यापक बंदोबस्त तैनात आहे.

सोशल मीडियावर कडक नजर निवडणूक काळात समाजमाध्यमांवरून अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊ नयेत यासाठी सायबर सेल पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. प्रत्येक पोस्टवर बारकाईने नजर ठेवली जात असून, अफवा पसरवणाऱ्यांवर किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.