Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपचे सर्वसामान्याना अडचणीत आणण्याचे धोरण माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील : महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन

भाजपचे सर्वसामान्याना अडचणीत आणण्याचे धोरण  माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील : महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा ण्याचे धोरण अवलंबले होते. सध्या भारतीय जनता पक्षाने भरमसाठ कर बाढवून सर्वसामान्यांना अडचणीत नाणण्याचे काम केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सर्वसामान्यांच्या राष्ट्रवादी आघाडीचे मेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे बहून प्रभाग एक मधील महाविकास नाघाडीचे उमदेवार शेडजी मोहिते, विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी ईसा रंगरेज या उमेदवारांना निवडून वा, असे आवाहन माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी केले. राजमाने हाऊसिंग नोसायटीमध्ये आयोजित प्रचार

सभेमध्ये ते बोलत होते. प्रभाग क्रमांक एकमधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शेडजी मोहिते, अभियंता सूर्यवंशी, रईसा रंगरेज, विजय घाडगे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. या बैठकीस किरण सूर्यवंशी, अमोल चिमाण्णा, जमीर रंगरेज, अभिजीत चिमण्णा मुश्ताक रंगरेज प्रमुख उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकमधील उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन प्रतीक पाटील यांनी यावेळी केले बालाजीनगर गृह निर्माण सोसायटीमध्येही प्रतीक पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कोपरा सभा, गाठी भेटी, तसेच घराघरात जाऊन संवाद साधला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठे सह कारी सहभागी झाले होते. विकास पारदर्शक कारभार, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या निर्धार यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या या जोश पूर्ण धडा त्यामुळे प्रभाग एक मध्ये महाविकास आघाडीची बाजू मजबूत होत असल्याच्या नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.