Breaking News! अखेर प्रतीक्षा सपली:, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा, पाहा महत्वाच्या तारखा
मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली.
'या' 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक
दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
महत्वाच्या तारखा –जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकजिल्हाधिकारी प्रसिद्धी – 16 जानेवारीअर्ज स्वीकारणे – 16 ते 21 जानेवारीछाननी – 22 जानेवारीउमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी (दुपारी 3 )अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्हे वाटप – 27 जानेवारी (दुपारी साडे तीन नंतर)जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान – 5 फेब्रुवारी (साडे सात ते साडे पाच)मतमोजणी – 7 फेब्रुवारी (सकाळी दहा पासून)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.