Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुसरं सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करायचंय? हा आहे स्वस्त पर्याय

दुसरं सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करायचंय? हा आहे स्वस्त पर्याय


मोबाईलचे दोन नंबर वापरताय आणि दुसरं सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज महाग वाटतंय का? बँकेची कामं, OTP आणि इतर कागदपत्रांसाठी सिम ॲक्टिव्ह ठेवणं आता महाग झालं आहे. यासाठी सर्वात स्वस्त पर्याय पाहून घ्या -

बहुतेक लोक किमान 2 सिम वापरतात. एक कॉलिंग आणि डेटासाठी वापरलं जातं, तर दुसरं बँक, OTP आणि इतर कागदपत्रांशी लिंक असल्यामुळे ते ॲक्टिव्ह ठेवावंच लागतं. सध्या सिम फक्त ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी महागडा रिचार्ज करावा लागतो. पूर्वीसारखे कमी किमतीचे व्हॅलिडिटी रिचार्ज, किंवा महिन्याला 1 GB किंवा 2 GB डेटा आणि लिमिटेड कॉल्स असलेले स्वस्त रिचार्ज आता उपलब्ध नाहीत. आता सर्व रिचार्ज महाग झाले आहेत.
सिम नेहमी ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी सर्व टेलिकॉम नेटवर्कचे रिचार्ज खूप महाग झाले आहेत. Jio, Airtel, Vodafone नेटवर्कवर फक्त सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी किमान 200 रुपये भरावे लागतात. वर्षाला हे 2000 रुपयांहून जास्त होतात. जर तुम्हालाही ही समस्या येत असेल, तर त्यावर उपाय येथे आहे.

Jio, Airtel, Vodafone सह खासगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महाग झाले आहेत. त्यामुळे BSNL सर्वात कमी किमतीत सिम ॲक्टिव्हेशन प्लॅन देत आहे. खासगी टेलिकॉम नेटवर्कवर महिन्याला सुमारे 200 रुपये द्यावे लागतात, तर BSNL सेवेमध्ये तीन महिन्यांसाठी 100 रुपये पुरेसे आहेत.

BSNL नेटवर्कवर 60 ते 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी फक्त 100 रुपये भरणे पुरेसे आहे. यामुळे सुमारे तीन महिने सिम ॲक्टिव्ह राहील. BSNL हा एक चांगला पर्याय आहे. पण आता प्रश्न पडतो की, दुसरं सिम दुसऱ्या नेटवर्कवर असेल तर काय करावं?

तुमचा प्रायमरी नंबर तुमच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार ठेवा. दुसरा नंबर जो फक्त कागदपत्रांसाठी आहे किंवा जास्त वापरला जात नाही, पण तो ॲक्टिव्ह ठेवायचा असेल, तर ते सेकंडरी सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करा. यामुळे तुम्ही वर्षाला किमान 1600 रुपयांची बचत करू शकता.
BSNL नेटवर्कचे अनेक फायदे आहेत. सध्या BSNL देशभरात आपले नेटवर्क मजबूत करत आहे. BSNL सर्वात कमी किमतीत डेटा, अनलिमिटेड कॉल्ससह अनेक सुविधा देणार आहे. जर तुम्ही वर्षाला पैसे वाचवण्याचा विचार करत असाल, तर हा उपाय वापरू शकता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.