Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन्यथा तुमचे मत बाद ठरेल! जाणून घ्या, यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदान कसे करावे?

अन्यथा तुमचे मत बाद ठरेल! जाणून घ्या, यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदान कसे करावे?


पुणे: राज्यात २९ महापालिकांच्या मतदान आणि निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारीला सकाळपासून मतदान सुरु होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून पक्षांचा प्रचारही थांबणार आहे. यंदाच्या मतदान प्रक्रियेत बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. नागरिकांना एका प्रभागातून ४ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच ४ वेळा बटन दाबावे लागणार आहे. ही मतदान प्रक्रिया कशी असणार आहे? हे जाणून घेऊयात!

मतदान कसे करावे?
तुमचे एक मत नाही, तर ४ मते नगरसेवक निवडून आणणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. 

* अ गट : पांढरा रंग (White)
* ब गट : फिकट गुलाबी रंग (Light Pink)
* क गट : फिकट पिवळा रंग (Light Yellow)
* ड गट : फिकट निळा रंग (Light Blue)

असे चार गट ईव्हीएम मशीनवर देण्यात आले आहेत. त्या गटामध्ये उमेदवाराचे नाव आणि चिन्ह असणार आहे. त्यापुढे मतदान करण्याचे बात देण्यात आले आहे.
मतदान प्रक्रिया : स्टेप-बाय-स्टेप

- प्रत्येक जागेसाठी (अ, ब, क, ड) उमेदवारासमोरील बटण दाबा.
- बटण दाबल्यानंतर त्या जागेसाठी लाल दिवा (Light) लागेल.
- 'ड' जागेचे मतदान झाल्यानंतर लांब 'बजर' वाजेपर्यंत थांबा.

महत्वाची सूचना : चारही जागांसाठी मतदान केल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अन्यथा तुमचे मत बाद ठरेल.
(उमेदवार पसंत नसल्यास 'नोटा'चा पर्याय उपलब्ध आहे.)



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.