Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजबच झालं.. मिरजेत अपक्ष उमेदवाराला स्वतःचेही मत नाही मिळालं; मतदान प्रक्रियेवर संशय

अजबच झालं.. मिरजेत अपक्ष उमेदवाराला स्वतःचेही मत नाही मिळालं; मतदान प्रक्रियेवर संशय


मिरज : महापालिका निवडणुकीत मिरजेतील एका अपक्ष उमेदवाराला स्वतःचेही मत मिळाले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभाग सातमधील 'ब' गटातून निवडणूक लढविलेल्या अपक्ष उमेदवार विनायकराजे भोसले यांनी या संशयास्पद मतदान प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

विनायकराजे भोसले यांना प्रभाग सातमधील 'ब' गटात ११८ मते मिळाली. मात्र, ज्या मतदान केंद्रावर उमेदवार भोसले व त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी मतदान केले होते, त्या बूथवर त्यांना शून्य मते मिळाल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. स्वतःचे मतही मिळाले नसल्याने उमेदवार भोसले चक्रावून गेले आहेत. महापालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रिया संशयास्पद व फसवणुकीची असल्याचा आरोप करत, या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून फेरमतदानाची मागणी करणार असल्याचे विनायकराजे भोसले यांनी सांगितले. या घटनेमुळे मिरजेत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रकार नसल्याचे सांगून भोसले यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.