आयकर विभागाने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
कर्नाटकच्या राजधानी बेंगळुरूमध्ये कॉन्फिडेंट ग्रुपच्या चेअरमन आणि मालक सी जे रॉय यांनी ऑफिसमध्ये गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
बेंगळुरूच्या रिचमंड सर्कलजवळील कॉन्फिडेंट ग्रुपच्या कार्यालयात ही घटना घडली. या घटनेने उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाकडून सीजे रॉय यांच्या कार्यालयात छापा सुरू होता. विभागाचे अधिकाऱ्यांकडून कार्यालयात चौकशी सुरू होती. सीजे रॉय यांच्या कार्यालयावर मागील वर्षी म्हणजे डिसेंबर २०२५ मध्येही छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर आज शुक्रवारी ३० जानेवारी रोजी पुढील चौकशी सुरू करण्यात आली. याचदरम्यान सीजे रॉय कंपनीच्या एका रुममध्ये गेले. त्यानंतर रूमध्ये जाऊन स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे मालक सीजे रॉय यांनी ऑफिसमध्ये जाऊन रूममध्ये स्वत: वर गोळ्या झाडल्या. त्यांनी स्वत: वर गोळ्या झाडल्या, त्यावेळी आयकर विभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. अधिकारी ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये होते. तर सीजे रॉय यांनी आयुष्य संपवल्याने उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियल इस्टेट आणि ग्राहक क्षेत्रातील कंपनी असलेल्या कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सीजे रॉय हे आयकर विभागाच्या सततच्या छाफ्यामुळे प्रचंड तणावात होते. त्यांच्या विरोधात विभागाकडे उत्पन्न स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे पुरावे आढळले होते. याचदरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसलाय. त्यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.