बिऊर (ता. शिराळा) येथे एक चार वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. मुलगा आणि त्याची बहीण अंगणात खेळत असताना डुख धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून चार वर्षीय मुलाला फरफटत ओढत अर्धा ते पाऊण किलोमीटर नेले. त्यानंतर बिबट्याच्या सततच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांनी चिडून वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली. ही घटना आज सायंकाळी सहा ते सहा वाजण्याच्या
नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मुलाला सोडले मात्र या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला राजवीर हनुमंत पाटील असे त्या मुलाचे नाव आहे. राजवीर व त्याची सहा वर्षांची बहीण कार्तिकी आपल्या घराच्या बाहेर अंगणात खेळत होते. त्यावेळी बिबट्याने झडप घालून राजवीरला फरफटत नेले. ही घटना त्याची बहीण कार्तिकी हिने आपल्या घरात ओरडत सांगत गेली.. घरातील आई-वडील अन्य मंडळींनी दंगा करून बॅटरीच्या साह्याने बिबट्याचा पाठलाग सुरु केला. बिबट्याने बिऊरच्या हद्दीत प्रचिती दूध संघाच्या पाठीमागे राजवीरला सोडून दिले. यात राजवीरचा मृत्यू झाला.
मुलाचे पार्थिव शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले आहे. आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. सततच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच वन विभागाचे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शव विच्छेदन करायचं नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. वन, महसूल आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.