महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले. मात्र, त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 11 तर, राज ठाकरेंच्या मनसेला पाच जागा मिळाल्या.
कल्याण डोंबिलीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबळावर सत्तेपासून दूर आहे. उद्धव ठाकरेंच्या 11 नगरसेवकांपैकी चार जणांनी त्यांची साथ सोडल्याची माहिती आहे. दोन नगरसेवक नाॅट रिजेबल आहेत. तर, दोन जणांनी थेट मनसेला साथ दिली आहे. मनसेनी विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करताना त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक देखील होते. त्यामुळे मनसेकडे सात नगरसेवक झाले आहेत.मनसेने या सात नगरसेवकांसह शिंदेंना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेनेचा महापौर कल्याण डोंबिवलीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडे 50 नगरसेवक आहेत. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने महायुतीमध्ये ही निवडणूक लढली होती. मात्र, महापौर पदावरून दोघांमध्ये रस्सीखेच आहे.
मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला मनसेना पाठींबा दिल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना राजू पाटील यांनी पाठींबा दिल्याचे सांगितले.
पक्षीय बलाबल कल्याण-डोंबिवली
भाजप - 50शिवसेना (एकनाथ शिंदे) - 53शिवसेना (उद्धव ठाकरे) - 11 (यातील चार जण मनसे, शिंदेंच्या संपर्कात)मनसे - 5राष्ट्रवादी (शरद पवार) -1काँग्रेस - 2
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.