सांगली प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपची भव्य प्रचार फेरी. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचे कमळ चिन्हाला पसंती - आमदार सुधीर दादा गाडगीळ
सांगली: सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचाराला निर्णायक टप्प्यावर नेले असून प्रभाग क्रमांक १४ मध्ये आज शक्तिप्रदर्शनात्मक प्रचार फेरीद्वारे भाजपाने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली.
सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाचे वंदन करून आमदार सुधीरदादा गाडगीळ व सौ. मंजिरी गाडगीळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या भव्य प्रचार फेरीचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक १४ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. विजय साळुंखे, श्री. उदय बेलवलकर, सौ. मनीषाताई कुकडे व सौ. अनिताताई पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगली शहराच्या विकासाचा रोडमॅप मांडताना भाजपाच्या विकासाभिमुख व लोककल्याणकारी धोरणांचा उल्लेख केला. सुरक्षितता, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपाने राबविलेल्या योजनांमुळे शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक १४ मध्ये भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या फेरीत नागरिकांनी जागोजागी आमदार गाडगीळ यांचे औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले, "प्रभाग १४ मधील नागरिकांचे प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, केवळ विकासाच्या राजकारणाला साथ देऊन भाजपला मतदान करा. प्रलंबित कामे पूर्ण करून या प्रभागाचा आदर्श प्रभाग म्हणून विकास करणे हाच माझा संकल्प आहे." जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची संघटनशक्ती आणि भाजपाच्या ठोस धोरणांच्या बळावर सशक्त, सुरक्षित व समृद्ध सांगली घडविण्याचा निर्धार या प्रचार फेरीतून अधोरेखित झाला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रचार फेरीस भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक सुप्राव मद्रासी,माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर,जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर, भाजपा युवा मोर्चा सांगली शहर जिल्हा अध्यक्ष शांतिनाथ कर्वे, जिल्हा सचिव उदय मुळे,मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, संदीप कुकडे, हनमंत पवार, शिवराज बोळाज, माधुरी वसगडेकर,स्मिता पवार, अनिल गडकरी, प्रथमेश वैद्य, सोहम जोशी, रेखा पाटील, शोभा राजमाने,कुणाल संकपाळ,किरण कपाले,शुभम चव्हाण,आदी सर्व भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ केंद्र प्रमुख तसेच प्रभागातील बंधू-भगिनी व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रचार फेरीमुळे संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापले असून प्रभाग १४ मध्ये भाजपाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.