Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय; प्रभाग १८ चा कायापालट करणार - आमदार सुधीर दादा गाडगीळसांगली:,

सांगलीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय; प्रभाग १८ चा कायापालट करणार - आमदार सुधीर दादा गाडगीळ


सांगली: सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. शैलेश पवार, सौ. गाथाताई जगदाळे, सौ. वैशालीताई गवळी व बिस्मिल्ला शेख यांच्या प्रचारार्थ आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी झंझावाती प्रचार सभा घेतली. 

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी येणाऱ्या काळात प्रभाग १८ चा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा आणि या भागाचा कायापालट करण्याचा संकल्प व्यक्त केला"प्रभाग १८ च्या नागरिकांनी नेहमीच मला साथ दिली आहे. या प्रेमाची परतफेड मी या भागाचा कायापालट करून आणि प्रलंबित विकासकामे पूर्ण करूनच करेन. विकासाची ही गंगा अखंड वाहती ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आशीर्वाद द्या," असे आवाहन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी नागरिकांशी संवाद साधताना भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती देत महानगरपालिकेत सक्षम, प्रामाणिक व लोकहित जपणारे प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपाच्या उमेदवारांनीही प्रभागातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व महिला-युवक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सभेला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग १८ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी प्रभागातील विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही नागरिकांनी आमदार गाडगीळ यांना दिले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ,सर्व भाजपा अधिकृत उमेदवार, रोहित जगदाळे,अमर पडळकर,सुमित शिंदे,प्रमोद नलवडे,वरद पडळकर, बसवेश्वर औंधे,सौरभ जाधव,दत्तराज मेंगाने,प्रकाश पाटील,नवनाथ मोरे, शेखर मोहिते,आदी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित नागरिकांनी भाजपाच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देत प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.