Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून बेदम मारहाण : इनाम धामणीतील नऊ जणांना अटक

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून बेदम मारहाण : इनाम धामणीतील नऊ जणांना अटक


नात्यातील मुलीशी बोलल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला डांबून ठेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणी इनाम धामणी येथील नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांना 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारत दत्तात्रय जाधव (वय ४१), ओंकार कल्लाप्पा सवदे (वय २७), वैभव रमेश मलमे (वय २७), उद्देश बाबुराव माळी (वय २७), श्रेयस सुधीर कोळी (वय 19), सागर लक्ष्मण कोळी (वय २६), रोहितकुमार बाळासो कदम (वय २४), संदिप सुभाष पाटील वय ४०), प्रयाग काशिनाथ पवार (वय २१, सर्व रा. इनाम धामणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अल्पवयीन मुलाने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दि. 1 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास पीडित मुलगा मित्रासमवेत वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी दुचाकीवरून जात होता. त्यावेळी संशयित कारमधून (एमएच 108777) शिवाजी स्टेडियमजवळ आले. त्यांनी कारचा हॉर्न वाजवल्याने पीडित मुलाने दुचाकी थांबवली. त्यावेळी संशयितानी त्याला आणि त्याच्या मित्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून कुपवाड येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे गेल्यावर त्याला डांबून ठेवून संशयितानी नातेवाईक मुलीशी का बोलतोस असे म्हणून लाथा बुक्क्या तसेच प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केली. नंतर सायंकाळी त्याला सोडून दिले.

पीडित मुलाने घरी येऊन हा प्रकार वडिलांना सांगितला. नंतर त्याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर अपहरण, मारहाण तसेच बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दि. 6 जानेवारी रोजी सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.