Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्वसामान्यांच्या हिताचा सांगली पॅटर्न

सर्वसामान्यांच्या हिताचा ' सांगली पॅटर्न'


सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एक वेगळी दृष्टी ठेवून काय करायचे ठरवले तर निश्चित दिशादर्शक काम उभे राहू शकते. बाचा प्रत्यत्र सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे कांनी आपल्या सांगली पॅटर्न या नच्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून दिला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य दिला आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासात्मक कामही प्रलंचित राहू नये है ही ते कटाक्षाने पाहतात. मात्र त्याचचरीचर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या आगळ्या वेगळ्या कामाचा सांगली पैटर्न हा संपूर्ण राज्यभर उत्सा उमटावेल असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी सांगली पॅटर्नच्या माध्यमातून राबवलेले अनेक उपक्रम लोकांच्या हिताचे आगि सर्वसामान्य जनतेला अत्यंत भावणारे असे आहेत.

घरेलू कामगार आरोग्य योजना, हुंडामुक्ती अभियान दिव्यांगाना स्वावलंबी करणारी स्वयंरोजगार योजना, पत्ती वरीवर पत्नीचे हे नाव सातबारावर लावमारी लक्ष्मी मुक्ती योजना, शेतकल्यांच्या पिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी बाय बेलर बीट आणि मोरंगरीच सर्वसामान्यांना मोफत पाच लाखापर्यंतचे उपचार व्हावेत यासाठी आयुध्यमान भारत योजना तसेच दिव्यांगासाठी अंत्योदय योजना या अभिनव योजना अत्यंत प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचा प्रसरन जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली पॅटर्न या आपल्या अभिनय उपक्रमातून करत आहेत. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी असतात त्यांना प्रचंड कामांचा व्याप असतो, आखून दिलेल्या बर्तुळाच्या बाहेर काऊन वेगळे काम करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि चालवला आहे. आणि खरोखरच त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नव्हे सर्वसामान्य लोकांना त्याचा खूप  होती आहे.

सातबारा उत्तान्माचार आजपर्यंत फक्त पतीचे नाव असायचे, मात्र वा संपत्तीची बाटेकरी पत्ती इतकीच पत्नी असते. त्यामुळे तिच्या नावाची नोंद असणे आवाश्यक आहे. ही माव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे लक्ष्मी मुक्ती योजना जिल्ह्यात राबवत आहेत आतापर्यंत जवळपास दहा हजारापेक्षा अधिक लोकानी सातबारावर आपल्या पत्नीची नोंद केली आहे. प्रत्येक उत्तलाठी कार्यालयात वाचाबत आदेश देण्यात आले आहेत. लक्ष्मी मुक्ती योजनेचरोबरच दिव्यांगाच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करण्याचे काम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रयत्नातून सुरू आहे. दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वयंरोजगार योजना त्यांनी राबवली आणि त्यास अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला, दिव्यांगांनी बनवलेल्या पणती व इतर वस्तूंची विक्री करून आम्हीही कमी नाही याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला. 
दिव्यांगाना यु.डी.आय.डी. या सरकारी योजनेच्या योजनेचा फायदा मिळावा बासाठी त्यांना अग्रहक्काने अंत्योदय योजनेच्या लाभ देण्यात येतो आहे. त्याचबरोबर घरेलू आरोग्य योजनेमुळे अनेक गोरगरीब महिला कामगारांना महगळ्या उपचारांथा लाभ मोफत मिळाला, घरकाम करून आपल्या आयुष्याची गुजरन करणान्या असंख्य महिला आज जिल्हाधिकाऱ्यांना दुया देत आहेत. अनेक घरची धुणी भांडी अशी कामे करून मिळणाऱ्या तुट्युल्या कमाईबर जीवन जगताना आरोग्याकडे लक्ष देणे शक्य नसते. एखाद्या दुर्धर आजाराबर महागडे उपचार करून घेणे, अशक्य कोटीतील गोट, पण जिल्हाधिका-यांनी अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून मा गोरगरिबांच्या या अडचणी सोडवण्यावा प्रयत्न केला त्यामुळे आज सांगती शहरातीलच नव्हे जिल्ह्यातील अनेक महिला या आजारातून मुक्त होऊन आपले निरोगी जीवन जगत आहेत, सांगली जिल्ह्याला कृष्णा आणि वारणा नदीचे कादान आहे. ताकारी, मौसाळ आणि टेंभू या पाणी योजना आज दुष्काळी भागाला बरदान उरत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून पिकवलेल्या पिकांना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बायसेलर बीट हा अभिनव उपक्रम राबवला. 

केवळ सांगली बाजारपेठेतच नव्हे तर शेतकन्यांनी पिकवलेला गाल देशाच्या प्रत्येक भागात तसेच परदेशातही तो बिकला जाचा हा त्यामागवा हेतू आहे. आणि या उपक्रमाला शेतकन्यानी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच या उपक्रमांतून आत्तापर्यंत १९४ कोटी ३९ लाख रुपयाने विक्री करार आले आहेत. शेतकयांचा हा बाल तातडीने पाठवण्याची व्यवस्था व्हावी यासाठी स्वतंत्र रेल्वेची सोय करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत करण्याचे धोरण आहे. मात्र त्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. या रेशन कार्डाच्या माध्यमातून आयुष्यमान कार्डची नोंदगी होने जिल्ह्यात अनेकांकडे अद्यावत रेशन कार्ड नाहीत. अशा रेशन कार्डची नोंदणी करून आयुष्यमान कार्ड नोंदवण्याची मोहीम जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरुवात केली आहे. 
त्यामुळे गोरगरिबांना पाच लाखापर्यंतचे उपचार सहज मिळू शकतील अशी व्यवस्था अविष्यात होणार आहे. हुंदा मुक्ती हा एक अभिनव उपक्रम एकर सामाजिक भावनेतून जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि हाती घेतला आहे. अत्यंत चंगळ्या पद्धतीने समाजाला, स्येल, आवडेल या पद्धतीने राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरलबरी करम सहा महिने थांब, अशी एक म्हण अलीकडे आपल्यात प्रचलित झाली आहे. पम अगदी त्या उलट म्हणजेच जलद गतीने काम करण्याचा अत्यंत वेगळा प्रयत्न जिल्हाधिकारी अशेक व्यकडे यांनी सांगली जिल्ह्यात सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा हा सांगली पॅटर्न राज्याच्या हिताचा म्हणजेच सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणारा ठरणारा आहे. त्यामुळे हा सांगली पॅटर्न भविष्यात संपूर्ण राज्यभरात राबबला जाईत अशी अपेक्षा आहे.

प्रकाश कांबळे ज्येष्ठ पत्रकार, सांगली,

सांगली दर्पण 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.