सांगली : येथील सोनार गल्लीजवळील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. नाल्यात मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ सांगली शहर पोलिस ठाण्यास कळवले. पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास पाचारण केले. स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाने नाल्यातून मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 50 ते 60 वर्ष आहे. शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह सिव्हीलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.