Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत शिंदे सेनेच्या उमेदवारास घरात घुसून मारहाण

मिरजेत शिंदे सेनेच्या उमेदवारास घरात घुसून मारहाण


मिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत बेकायदा जमाव जमवून शिंदे सेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरात घुसून भाजप उमेदवाराचा पुत्र व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसात सातजणांविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 14 रोजी सायंकाळी प्रभाग तीनमधील राखीव गटातील शिंदे सेनेचे उमेदवार सागर मोहन वनखंडे (वय 28) हे त्यांच्या घरात निवडणुकीच्या अनुषंगाने बुथ कमिटीची बैठक घेत असताना संदीप व्हनमाने व त्याच्या साथीदारांनी घराच्या आवारात जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी सागर यांचा मित्र सौरभ चंद यास धक्काबुक्की करीत संदीप व्हनमाने याने त्यास हाताने मारहाण केली. याबाबत सागर वनखंडे यांनी संदीप व्हनमाने यास जाब विचारला असता, व्हनमाने याने ‌'तू बाहेर ये, तुला दाखवतो, तुझी लायकी आहे का निवडणूक लढवायची‌' अशा शब्दांत धमकी दिली. तसेच निवडणूक कशी लढवतोस हे दाखवतो, अशी दमदाटी केली. 

यावेळी जुबेर चौधरी, मकरंद ठोंबरे, प्रथमेश पांढरे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता व्हनमाने व साथीदारांनी त्यांच्याही अंगावर धावून जात धक्काबुक्की केली, ‌'तुम्ही मध्ये पडाल तर तुम्हालाही सोडणार नाही,‌' अशी धमकी दिल्याचे सागर वनखंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी संदीप सोपान व्हनमाने (रा. इस्रायल नगर, मिरज), ओंकार संजय कांबळे, विशाल साळुंके, स्टीवन देवकुळे, समित खानविलकर, विशाल सौंदडे, अभी होळकर (सर्व रा. मिरज) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.