Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजकिय ड्रामा वाढणार.! "भाजपला शिंदेंसोबत युती करण्याची इच्छा नव्हती.."; 'या' बड्या नेत्यानं सांगितली आतली गोष्ट

राजकिय ड्रामा वाढणार.! "भाजपला शिंदेंसोबत युती करण्याची इच्छा नव्हती.."; 'या' बड्या नेत्यानं सांगितली आतली गोष्ट


राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणूकीच्या प्रचारसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असल्याने प्रत्येक पक्षातील बडे नेते आपल्या परीने मनातील गोष्टी बोलून दाखवत आहेत.

वनमंत्री गणेश नाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाण्यामध्ये भाजपला शिंदेसेनेसह युती करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र आता राजकिय ड्रामा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सध्या एकहाती वर्चस्व असले तरी त्यांना भाजपकडून वनमंत्री गणेश नाईक चांगलीच लढत देत आहेत. गणेश नाईक राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांचं ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व होते. मात्र, शिंदेंनी हळूहळू नाईकांचे वर्चस्व कमी करताना, आपली प्रतिमा मोठी केली. त्यामुळे नाईक व शिंदे हा संघर्ष ठाण्यामध्ये अनेकदा पहायला मिळाला आहे.

महानगरपालिकांची निवडणूक लागल्यानंतर नवी मुंबईमध्ये भाजप व शिंदेसेनेत युती होणार होती. मात्र शेवटच्या क्षणी युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले. काही अदृष्यशक्तींमुळे ही युती तुटली का? अशी विचारणा केली असता, गणेश नाईक म्हणाले की, माझी तर इच्छाच नव्हती. भाजपणे पूर्ण ठाणे जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे माझे मत होते. 

मात्र केंद्रीय नेतृत्त्वाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री फडणवीस यांना, घटक पक्षांना सोबत न घेतल्यास वेगळा संदेश जाईल असे सांगितले. आमचा शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वानूसार आम्ही, राज्यात व महापालिकेतही तीच भूमिका घेवून पुढे जात आहोत, असे नाईकांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईत कुठे फिस्कटले ?

वाटाघाटी करणारे आमच्या सहकार्यांनी शिंदेसेनेला यादी देण्यास सांगितले होते. नवी मुंबईत १११ नगरसेवक आहेत, परंतु त्यांनी तब्बल 57 उमेदवारांची यादी दिली. त्यांनी स्वत:हून स्वत:ला मोठा भाऊ असल्याची जाहीर केले. आशावेळी आमच्या लोकांनी, आम्ही तुम्हाला केवळ 20 जागा देवू शकतो, असे स्पष्ट केले.

या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी कुठेच नव्हतो. आमच्या समितीच्या वतीने सर्व वाटाघाटी केल्या आणि त्यांना प्रस्ताव देण्यास सांगितले. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याकडून काहीच निरोप आला नाही. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या पक्षाने उमेदवारांना एबी फॉर्म वाटले, असे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.