'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारांना अजब सल्ला :,यशोमती ठाकूरांनी चांगलंच झापलं म्हणाल्या, 'वडिलांची प्रतिमा...'
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी 'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' असं वक्तव्य केलं. ते नांदेडमधील भाजपच्या एका स्थानिक प्रचारसभेत 8 जानेवारी रोजी बोलत होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाणांनी पक्ष बदलला, संस्कृती बदलली आणि मतदारांचा अपमान केला असल्याचं म्हणत त्यांनी अशोक चव्हाणांचे कान टोचले.
यशोमती ठाकूर यांचा अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, 'आदर्श चव्हाण का अच्छा अशोक चव्हाण. अशोक चव्हाण यांनी मोठी गफलत केली, त्यांनी आपली स्वत:ची किंमत स्वत: कमी करून घेतली आहे. नंतर त्यांनी आरोप करत सांगितलं की, घोटाळे करून भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण आपल्याच वडिलांची प्रतिमा विसरू लागले आहेत'. 'अशोक चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य खालच्या पातळीचे असून ते राजकारणाची पातळी विसरू लागलेत. अशा घाणेरड्या गोष्टी बोलून नंतर ते समाजात चुकीचा संदेश पसरवत आहेत', असे त्यांनी वक्तव्य केलं. तसेच नंतर त्या म्हणाल्या की, 'पक्ष बदलल्यानंतर त्यांनी संस्कृती, भाषा, संस्कार आणि विचारधारा देखील बदलली आहे. मतदारांची किंमत केवळ एका मटणापर्यंत करत नाही. मतदारांचा अवमान करणारे हे वक्तव्य निषेध निषेधार्थ आहे', असं त्या म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.