सांगलीत झेडपीचे वातावरण तापलं उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला, गाडी जाळली; पहाटे ३ वाजता जयंत पाटील घटनास्थळी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत येलूर जिल्हा परिषद मतदारसंघात बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार देविका घोरपडे यांचे पती आणि बहादूरवाडीचे माजी उपसरपंच भोजराज प्रदीपसिंह घोरपडे (वय ३८) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आज रोहित ज्ञानदेव सुतार (वय २७), अजय वसंत जाधव (२१), साहिल अल्ताफ हवालदार (२१), सागर रवींद्र शिंदे (२५), प्रथमेश बंडाजी यादव (२२ सर्व रा. बावची, ता. वाळवा) या संशयितांना अटक केली. जखमी अवधूत माळी रुग्णालयात उपचार घेत आहे, तर स्वप्नील जाधव व सहदेव पाटील यांचा शोध सुरू आहे. याबाबतची फिर्याद भोजराज घोरपडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती, संशयित शुक्रवारी (ता. २३) रात्री घोरपडे यांच्या हॉटेल आमराई येथे जेवण करण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये संशयितांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे समजताच भोजराज घोरपडे हॉटेलमध्ये आले. संशयित तरुणांना वाद करू नका, असे समजावून सांगत होते. त्याच वेळी संशयित हॉटेलच्या बाहेर गेले व हत्यारे घेऊन आले. त्यातील लाल रंगाचा शर्ट घातलेल्या एकाने भोजराज घोरपडे आमदार जयंत पाटील यांची भेट दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळताच आमदार जयंत पाटील यांनी पहाटे तीनच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना सूचना केल्या.यांच्यावर सुऱ्यासारखे हत्यार उगारले. रोहित सुतार याने घोरपडे यांच्या डोक्याच्या मागील भागात कोयत्याचा वार केला.
या झटापटीत घोरपडे यांना वाचवण्यासाठी आलेल्या संदीप खोत व चेतन गावडे यांच्या हाताला व बोटाला दुखापत झाली आहे. जमाव गोळा होताच संशयितांनी तेथून दुचाकीवरून पळ काढला. यावेळी जमावाने एका संशयिताची इलेक्ट्रिक दुचाकी पेटवून दिली. ही दुचाकी पूर्णपणे खाक झाली आहे. घोरपडे यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.