राहिल्या त्या आठवणी! मल्हार पाटेकरने शेअर केले अजित पवार आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ ला विमान अपघातात निधन झालं. अजित दादांचा झालेला मृत्यू अनेकांसाठी चटका लावणारा ठरला. महाराष्ट्रातील अजित पवार यांचे समर्थक, कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. अजूनही अजितदादा आपल्यात नाहीत यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. अजितदादांची मराठी कलाकारांशीही चांगली मैत्री होती. त्यापैकीच एक म्हणजे नाना पाटेकर. नानांचा लेक मल्हार पाटेकरने अजितदादा आणि नानांच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.
नाना आणि अजितदादांची खास मैत्री
अनेकदा जाहीर व्यासपीठावर अजित पवार आणि नाना पाटेकर एकत्र दिसले आहेत. नानांनी अनेकदा अजित पवारांच्या मिश्किल स्वभावाचं कौतुक करुन त्यांचीही फिरकीही घेतली आहे. नानांचा लेक मल्हार पाटेकरने अजितदादा आणि नानांचे खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आजवर कधीही पाहण्यात आले नाहीत. या फोटोत अजितदादा आणि नानांची घनिष्ट मैत्री पाहायला मिळतेय.
एका फोटोत दिसतं की, नाना आणि अजित पवार डायनिंग टेबलवर जेवायला बसले आहेत. त्यांच्या नानांची पत्नी नीलकांती आणि मल्हार उभा आहे. अजितदादा मल्हारसोबत बोलताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत नाना आणि अजितदादा घराच्या बाहेर कठड्यावर निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. हे फोटो समोर येताच चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केला आहे. राजकीय वलय सोडून आणि मोठे सुपरस्टार असूनही एखाद्या खास दोस्तांसारखे अजितदादा आणि नाना दिसत आहेत. मल्हार हे फोटो शेअर करुन लिहितो की, "आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे निधन ही आमची वैयक्तिक हानी आहे. ते आमच्यासाठी कुटुंबासारखे होते आणि आयुष्यभर तसेच राहतील. त्यांच्यासोबतच्या आठवणी अविस्मरणीय आहेत, त्यामुळे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.