Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्यापासून नवे नियम लागू, बातमी वाचल्याशिवाय टोल नाक्यावर एकही रुपया खर्च करू नका

उद्यापासून नवे नियम लागू, बातमी वाचल्याशिवाय टोल नाक्यावर एकही रुपया खर्च करू नका


नवी दिल्ली: FASTag वापरणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून FASTag संदर्भातील महत्त्वाचा नियम बदलणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

नव्या नियमांनुसार कार, जीप आणि व्हॅनसाठी जारी होणाऱ्या नवीन FASTag वर Know Your Vehicle (KYV) ही पोस्ट-ॲक्टिव्हेशन प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या निर्णयामागचा उद्देश खासगी वाहन मालकांना FASTag ॲक्टिव्हेशननंतर भेडसावणाऱ्या अनावश्यक अडचणी दूर करणे हा आहे.

आधी काय अडचण होती?

आतापर्यंत KYV ही प्रक्रिया FASTag ॲक्टिव्हेशननंतर वाहनाची माहिती पडताळण्यासाठी केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया अनेकदा वेळखाऊ ठरत होती. FASTag खरेदीवेळी सर्व वैध कागदपत्रे सादर करूनही वापरकर्त्यांना पुन्हा-पुन्हा फॉलोअप करावा लागत होता. यामुळे टोल पेमेंट सुरू करण्यात उशीर, तक्रारी आणि गोंधळ वाढत होता.

1 फेब्रुवारी 2026 पासून नेमकं काय बदलणार?
1 फेब्रुवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर जारी होणाऱ्या नवीन FASTag साठी कार मालकांना ॲक्टिव्हेशननंतर KYV पूर्ण करण्याची गरज राहणार नाही. आता वाहनाशी संबंधित संपूर्ण पडताळणी FASTag ॲक्टिव्हेशनपूर्वीच केली जाईल. म्हणजे एकदा FASTag सुरू झाला की त्यानंतर कोणत्याही अतिरिक्त व्हेरिफिकेशनची आवश्यकता भासणार नाही. हा नवा नियम फिजिकल पॉइंट ऑफ सेलवरून खरेदी केलेल्या FASTag ला तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून घेतलेल्या FASTag ला दोन्ही ठिकाणी लागू असेल. ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर वापरकर्ते कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट FASTag वापरू शकतील.
आधीच्या FASTag वापरकर्त्यांसाठी काय?

जे कार FASTag आधीच जारी झाले आहेत, त्यांच्यासाठी KYV नियमितपणे करणे बंधनकारक राहणार नाही.
फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच KYV करावं लागेल, जसं की -

चुकीचा FASTag जारी झाल्याची तक्रार

टॅग खराब किंवा सैल असल्याची समस्या

FASTag च्या गैरवापराचा संशय

या प्रकारची कोणतीही तक्रार नसल्यास, जुन्या FASTag वापरकर्त्यांना KYV करण्याची गरज नाही.

या बदलाचा फायदा काय होणार?
NHAI ने FASTag जारी करणाऱ्या बँकांसाठी प्री-ॲक्टिव्हेशन व्हेरिफिकेशन अधिक कडक केलं आहे.
आता FASTag तेव्हाच ॲक्टिव्ह होईल, जेव्हा वाहनाची माहिती थेट VAHAN डेटाबेस मधून पडताळली जाईल.

जर VAHAN डेटाबेसवर माहिती उपलब्ध नसेल, तर संबंधित बँकेला ॲक्टिव्हेशनपूर्वी वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटद्वारे पडताळणी करावी लागेल. या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी बँकेची असेल.

NHAI च्या मते, या बदलामुळे FASTag प्रक्रिया अधिक सोपी होईल, तक्रारींची संख्या कमी होईल आणि राष्ट्रीय महामार्गांवरील टोल पेमेंटचा अनुभव अधिक सुरळीत व वेगवान होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.