Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईच्या महापौर पदासाठी शिंदे ठाकरे बंधूंसोबत? स्वत: म्हणाले, 'आमची आणि भाजपाची...'

मुंबईच्या महापौर पदासाठी शिंदे ठाकरे बंधूंसोबत? स्वत: म्हणाले, 'आमची आणि भाजपाची...'


मुंबईमध्ये पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या मदतीशिवाय महापौर बसणार असल्याचं शुक्रवारी लागलेल्या निकालांमधून स्पष्ट झालं. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या महायुतीला लोकांनी भरभरुन मतदान केलं. महायुतीला 122 जागांवर विजय मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्रितपणे 69 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाने 89, शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 65 तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आता भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार हे निश्चित झालेलं असतानाच शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंना महापौर पदाचा संदर्भ देत ठाकरे बंधूंनी ऑफर दिली तर तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत जाल का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना शिंदेंनी आपली भूमिका अगदी स्पष्ट शब्दांमध्ये मांडली.

महापौर पदावर काय बोलले शिंदे?
शिंदेंनी सुरुवातीला बोलताना, "मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्तेसाठी नकोय. आम्हाला मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे. मुंबई ही नावाला जासेशी दिसली पाहिजे. मुंबईकर मुंबईबाहेर फेकला गेला आहे. त्याला पु्न्हा मुंबईत आणायचा आहे. यासाठी झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी रखडलेले एसआरएचे प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे आहेत, यासाठी महायुतीचा महापौर होईल. मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे," अशा शब्दांमध्ये विजयावर भाष्य केलं.

...म्हणून लोकांनी आम्हाला मतदान केलं

पुढे बोलताना शिंदेंनी, "मुंबईच्या लोकांना मी धन्यवाद देतो. ज्यांनी चांगलं काम केलं त्यानुसार लोकांनी मतदान केलं. लोकांना विकासाला मत दिलं. आमचा तोच मुद्दा होता. त्यांच्या प्रचाराचा मुद्दा भावनिक होता. साडेतीन वर्षामध्ये मुंबईसाठी जे काम झालं, रेल्वे, मेट्रो, अटल सेतू यासारखी काम दिसू लागली. ही काम करणारी लोक आहेत असा विश्वास बसल्याने मुंबईकरांनी आम्हाला मतदान केलं," असंही म्हटलं.

ठाकरे बंधूंसोबत जाणार का?
दरम्यान, याच पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने ठाकरे बंधूंनी तुम्हाला सोबत घेतलं तर सत्तेत जाणार का? असा सवाल महापौर पादाचा संदर्भ देत विचारला. यावर शिंदेंनी, "आमचा अजेंडा साफ आणि स्वच्छ आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊ पुढे चाललो आहे. आमची आणि भाजपाची युती आताची नाहीये. आमची विचारधारा एक आहे. विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही," असं उत्तर देत ठाकरेंसोबत कोणत्याही परिस्थिती जाणार नाही असं अधोरेखित केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.