Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना


मुंबईतील गोरेगावमध्ये घराला लागलेल्या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गाढ झोपेत असतानाच फ्रीजचा स्फोट झाला. या आगीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटानास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणली गेली, पण तोपर्यंत ३ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. गोरेगाव पोलिसांकडून या घटनेची नोंद केली असून तपास केला जात आहे.

मुंबईतील गोरेगाव पश्चिममधील भगतसिंह नगरमध्ये एका सोसायटीमधील घराला भयंकर आग लागल्याची घटना पहाटे घडली. ही आग घरातील फ्रीजचा स्फोट झाल्यामुळे लगाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. या भीषण आगीमध्ये ३ जणांचा होरपळून जिवंत मृत्यू झालाय. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

सर्वजण झोपेत असतानाच अचानक फ्रीजचा स्फोट झाला. त्यानंतर घरात सगळीकडे आग पसरली गेली. घरातील लोक झोपेत असल्याने काही कळण्याच्या आत आग भडकली. सोसायटीमधील काही लोकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला या आगीबाबत माहिती दिली अन् आग विझवण्याचे प्रयत्न केले. पण घरातील सामनामुळे आगीचा भडका उडाला. गोरेगावमधील अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाले अन् आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पोलिसांनी ३ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले अन् पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.