Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून कॉलेज कॉर्नर परिसरातील घटना : कुपवाडमधील दोन संशयित ताब्यात

सांगलीत तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून कॉलेज कॉर्नर परिसरातील घटना : कुपवाडमधील दोन संशयित ताब्यात


शहरातील माधवनगर रस्त्यावरील कॉलेज कॉर्नर येथे एका तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पूर्वी झालेल्या वादातून तसेच एकमेकांकडे रागाने पाहण्यातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी कुपवाड येथील दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. विष्णू सतीश वडर (वय 22, रा. वडर कॉलनी, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. आर्यन हेमंत पाटील (रा. रत्नदीप हाउसिंग सोसायटी कुपवाड), आदित्य प्रमोद वालकर (रा. राणा प्रताप चौक कुपवाड) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. काही महिन्यापूर्वी मृत वडर आणि पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

गुरुवारी दुपारी मृत वडर कॉलेज कॉर्नर परिसरात थांबला होता. त्यावेळी पाटील हा साथीदार वालकर याच्या समवेत तेथे आला होता. त्यांच्यात पुन्हा पूर्वीचा वाद तसेच एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून वाद झाला. त्यानंतर पाटील याने त्याच्याकडील धारदार हत्याराने वडर याच्यावर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर दोघेही हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सांगली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वडर याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली होती. घटनेनंतर अवघ्या काही तासात दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.