घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सराईत दोन गुन्हेगारांना अटक : सात गुन्हे उघड सांगली एलसीबीची कारवाई
विटा, आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सराईत दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
दादासो आण्णा बुधावले (वय २०, रा. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा), सुनिल मारुती मंडले (वय २६, रा. देवापुर, ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर संतोष तानाजी जाधव, विक्रम आनंदा बाबर, लक्ष्मण भिमराव जाधव, संजय आण्णा बुधावले (सर्व रा. देवापुर, ता. माण, जि. सातारा) अशी पसार झालेल्यांची नावे आहेत. घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केले होते.पथक चोरट्यांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे खानापूर, आटपाडी तालुक्यातील घरफोड्या बुधावले, मंडले यांच्या टोळीने केल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी मारुती कार (एमएच ०९ डीए ००५१) चा वापर करून आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तर विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या करून चोरीचे दागिने सराफाना विक्री केल्याची कबुली दिली. सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, अतुन माने, सुशील म्हस्के, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते, रुपेश होळकर, अभिजीत पाटील, अजय पाटील, शिवाजी सिद, गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.