Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरआदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करा - जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करा - जिल्हाधिकारी अशोक काकडे


- मतदान दि. 5 फेब्रुवारी 2026 तर मतमोजणी दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी

- निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

सांगली : राज्य निवडणूक आयोगाने आजच राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जिल्हा परिषद सांगली व आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा व मिरज या 10 पंचायत समितींचा समावेश आहे. मतदान दि. 5 फेब्रुवारी 2026 तर मतमोजणी दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. ही आचारसंहिता निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषद / पंचायत समिती क्षेत्रात लागू राहील. या कालावधीत सर्वांनी 'आदर्श आचारसंहितेचे' तंतोतंत पालन करावे आणि निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये 61 गटांमध्ये आणि 122 गणांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. एकूण 18 लाख 18 हजार 736 मतदार आहेत आणि 2039 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान निर्भय व पारदर्शी वातावरणात पार पडावे, यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये आजपासून सुरू झालेली आहे. या सर्व ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांतअधिकारी अथवा तहसीलदार यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक – दि. 1 जुलै 2025.  (1) जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख – दि. 16 जानेवारी 2026 (शुक्रवार). (2) नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी – दि. 16 जानेवारी 2026 (शुक्रवार) ते दि. 20 जानेवारी 2026 (मंगळवार) (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) दि. 21 जानेवारी 2026 (बुधवार) (सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत) (रविवार दि. 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात येणार नाही). (3) नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी – दि. 16 जानेवारी 2026 (शुक्रवार) ते दि. 21 जानेवारी 2026 (बुधवार) (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) (रविवार दि. 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही). (4) नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे – दि. 22 जानेवारी 2026 (गुरूवार) (सकाळी 11 वाजल्यापासून). (5) वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. 22 जानेवारी 2026 (गुरूवार) छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच. (6) उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक – दि. 23 जानेवारी 2026 (शुक्रवार), दि. 24 जानेवारी 2026 (शनिवार) व दि. 27 जानेवारी 2026 (मंगळवार) (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) (रविवार दि. 25 जानेवारी 2026 व सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही). (7) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप – दि. 27 जानेवारी 2026 (मंगळवार) (दुपारी 3.30 नंतर). (8) मतदानाची तारीख – दि. 5 फेब्रुवारी 2026 (गुरूवार) (सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत). (9) मतमोजणी तारीख – दि. 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार) (सकाळी 10.00 पासून). (10) निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – दि. 10 फेब्रुवारी 2026 (मंगळवार) पर्यंत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.