मुंबई: महापालिका निवडणूक मतदानादिवशी मतदारांना मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे. मात्र, एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
१५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु, ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल, अशी माहिती गगराणी यांनी दिली. लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांनी तो बजावावा, असे गगराणी म्हणाले.
मतदार ओळखपत्र नसल्यास हे पुरावे ग्राह्य
पासपोर्टआधार ओळखपत्रवाहन चालविण्याचा परवानापॅन कार्डकेंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे.राष्ट्रीयीकृत बँका किंवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुकसक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखलाराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.)लोकसभा, राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा, विधान परिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्रस्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्रकेंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्डघरोघरी प्रचाराची उमेदवारांना मुभामुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजता थंडावल्या. मात्र, जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवार पाचपेक्षा कमी लोकांना सोबत घेऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करू शकतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दिल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.