महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम पहायला मिळत आहे. तिकीट वाटपावरुन महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. फक्त सर्वसाधारण कार्यकर्तेच नाही तर बड्या नेत्यांना देखील याचा फटका बसला. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप सर्वच पक्षांकडून केला जात आहे. अशातच पुण्यातील बाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी एका ओळीत तिकीट वाटपाचा सगळा खेळ उघड केला आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता पुण्याच्या भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी नीही कार्यकर्त्यांची व्यथा फेसबुक पोस्टद्वारे मांडलीय. कवी गुलजार यांच्या दोन ओळी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करुन निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना त्या ओळी समर्पित असल्याचं सांगितलंय. गुलजारची..."कुछ कह गए.. कुछ सह गए.. कुछ कहते कहते रह गए..." अशा ओळी त्यांनी फेसबुक पोस्टवर टाकल्या आहेत.
पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक किरण बारटक्के पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार
पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक किरण बारटक्के पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार आहेत. प्रामाणिकपणे पक्षाचे काम करूनही उमेदवारी का नाकारली याबाबत ते मोदींकडे न्याय मागणार आहेत. सोबत तिकीट नाकारणा-या भाजप आमदार, नेत्यांची मोदींकडे तक्रार करणार आहेत. पुणे शहरात घडलेल्या सर्व प्रकाराबाबत प्रभाग क्रमांक ३२मधील सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पुण्यातील नेत्यांच्या तक्रारी करणार आहेत. ज्या प्रभागात भाजपला कुणीही विचारत नव्हतं त्या प्रभागात आम्ही सुरुवातीपासून काम करतोय अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी मिळावी यासाठी फिरलो पण आम्हाला कोणी विचारलं नसल्याचा बारटक्के यांचा आरोप आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.