बंटी जहागीरदार याच्यावर झालेल्या गोळीबाराचा घटनाक्रम समोर आला आहे. दोघे हल्लेखोर होते. ते दुचाकीवर फिरत होते. बंटी जहागीरदार येणाऱ्या मार्गावरून ते घिरट्या घालत होते. आधीपासून दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांपैकी एकाने दुचाकीवरून चाललेल्या बंटी जहागीरदार याला मागून दगड मारला.
दगड लागल्याने बंटी जहागीरदार मागच्या मागे गाडीवरून उतरला अन् मारलेला तोच दगड परत हल्लेखोरावर भिरकावला. त्याक्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ पिस्तूल काढून बंटी जहागीरदारावर गोळीबार केला. यात जखमी असलेले बंटी जहागीरदार याचा मृत्यू झाला असून, जिल्हा रुग्णालयात मुस्लिम लोकांनी गर्दी केली होती. परंतु उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह पुणे ससून इथं नेण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीरामपूर इथल्या कब्रस्तानामधील अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार यांच्यावर संत लूक हॉस्पिटलच्या अलीकडच्या गेट समोर थांबलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये तो गंभीर जखमी झाले असून, त्याला आधी श्रीरामपूरमधील कामगार हॉस्पिटल इथं प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी आता अहिल्यानगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार हा मित्र अमीन हाजी याच्या बाईकवर मागे बसून घरी परतत होता. संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेट जवळ तो आले असता आधीपासून तिथं उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला. दगड लागल्याने ते मागच्या मागे गाडीवरून उतरले व त्याने तो दगड परत, त्या हल्लेखोरावर भिरकावला.
बंटी जहागीरदारला इथं लागल्या गोळ्या
हल्लेखोरांनी या क्षणी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार केला. बंटी जहागीरदार याच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर सुद्धा गोळी लागल्याचे सांगितले जाते. गोळी लागल्याने ते खाली कोसळले. त्याचवेळी मागून येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना उचलून कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉ. जगधने व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून प्रथमोपचार केले. परंतु त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजकीय नेत्यांची पळापळ....
हॉस्पिटलमध्ये नगराध्यक्ष करण ससाणे, मुजफ्फर शेख, अंजूम शेख, सचिन गुजर, माऊली मुरकुटे आदींनी तातडीने धाव घेतली. गोळीबाराची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रचंड समुदाय जमा झाला. लोकांच्या संतप्त भावना पाहता तातडीने पोलिसही ते पोहोचले. उपअधीक्षक जयदत्त भवार, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी श्रीरामपूर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवला होता. यावेळी दुसरीकडे श्रीरामपूरमधील सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौकात सुद्धा मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.
दुचाकीवर हल्लेखोरांच्या घिरट्या...
हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु पोलिसांच्या प्राथमिक तपासात एका दुचाकीवरून दोघे युवक बंटी जहागीरदार येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावर घिरट्या घालताना दिसत आहेत. तसंच पोलिसांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.