Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...


एक कोटी दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईमधील वेस्ट सायबर पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गच्चे व पथकाने पन्हाळ्यातील दोघा सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. इस्माईल शमशुद्दीन काझी (वय ४२ )व त्याचा भाऊ दस्तगीर शमशुद्दीन काझी (वय ५२) (दोघे सध्या राहणार पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री उशिरा दोघांना त्यांच्या राहते घरातून ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विमल कुमार गोयंका यांना मुंबईतील व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील करून घेतले. त्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवा तुम्हाला तिप्पट मोबदला देतो. असे सांगून त्यांच्या कडून वेळोवेळी ऑनलाईन तब्बल एक कोटी दहा लाख रुपये घेतले होते.त्यानंतर त्यांना संबंधित कंपनीचे बनावट ऐप तयार करून त्यावर त्यांची रक्कम तिप्पट झालेचे दाखवले. ते पाहून गोयंका यांना खात्यातील पैसे काढण्यास सांगून खात्री पटवून दिली.
त्यानुसार गोयंका यांनी खात्यातून तीन लाख रुपये काढून खात्री खात्री करून घेतली. पण काही दिवसानंतर गोयंका पैसे काढण्यासाठी प्रयत्न करू लागले तेव्हा पैसे निघाले नाहीत. म्हणून त्यांनी संबंधित व्यक्तीस फोन केला. तेव्हा त्याने गोयंका यांना रक्कम काढू नका टॅक्स मध्ये अडकाल असे सांगितले. पण पुढेही असेच करणे मिळू लागल्याने व फोन बंद येऊ लागल्याने गोयंका यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

प्राप्त तक्रारी वरून वेस्ट सायबर पोलीस स्टेशन क्राईम ब्रँच मुंबई यांनी ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कलमांतर्गत गुन्हा नोंद करून घेतला व तपास चालू केला.या तपासा दरम्यान गोयंका यांना आलेले व त्यांनी केलेल्या फोनचे नंबर तपासले. पण त्यातून काही निष्पन्न न झाल्याने गोयंका यांनी रक्कम पाठवलेल्या बँक खात्याची माहिती घेतली असता ते खाते हे वरील काझी बांधूनचे असल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गच्चे यांनी संपूर्ण माहिती घेऊन पन्हाळा गाठला. व पन्हाळा पोलिसांच्या सहकार्याने पन्हाळ्यातील इस्माईल काझी व दस्तगीर काझी या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी करून त्यातील इस्माईल काझी याला नोटीस देऊ सोडून दिले.तर दस्तगीर काझी याला पुढील तपासासाठी बरोबर नेले आहे.
पन्हाळ्यातील कारवाई ही स्थानिक पोलिसांना विश्वासात घेऊनच झाली असून मुंबई पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यात पन्हाळ्यातील काझी बंधुचे बँक खाते फसवणुकीसाठी वापरले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आण्णासो बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पन्हाळा



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.