Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Sangli Breaking News! अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची जिल्ह्यातील 17 जणांवर हद्दपारीची मोठी कारवाई

Sangli Breaking News! अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची जिल्ह्यातील 17 जणांवर हद्दपारीची मोठी कारवाई


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मिरजेतील प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझी याच्यासह काझी टोळीतील 8 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारजण, आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हे आदेश दिले आहेत. ऐन निवडणुकीत झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या सुरु असणारी महापालिकेची निवडणूक तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहमद युसूफ साहेबपीर चमनमलीक काझी (वय ३४, रा. टाकळी रोड, मिरज), मतीन ऊर्फ साहेबपीर चलनमलीक काझी (वय ३२, रा. टाकळी रोड, मिरज), अक्रम महंमद काझी (वय ४२, रा. काझीवाडा, मिरज), रमेश अशोक कुंजीरे (वय ३९, रा. उदगांव वेस, मिरज), अस्लम महंमद काझी, (वय ४८, रा. काझीवाडा, मिरज), आझम महंमद काझी (वय ३९, रा. गुरुवार पेठ, मिरज), अल्ताफ कादर रोहीले (वय ३६, रा. खाँजा बस्ती, मिरज), मोहसिन कुंडीबा गोदड (वय २६ वर्षे, रा. टाकळी रोड, मिरज) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरज ऊर्फ रमजान मौला शेख (वय ४४), शब्बीर मौल्ला शेख (वय २७), सौरभ विलास जावीर (वय २०), अर्जुन ईश्वरा गेजगे (वय ३५, सर्व रा. प्रकाशनगर, गल्ली नं. ६, कुपवाड, ता. मिरज) यांना सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजाराम सोपान बोडरे (वय ४६) सुदाम सोपान बोडरे (वय ४४, दोन्ही रा. ढोराळे (जाधववाडी), ता. खानापूर, जि. सांगली) यांना सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितेंद्र ऊर्फ जिच्या दगडु काळे (वय ५२, रा. करगणी, ता. आटपाडी), रोहीत किशोर पवार (वय १९, रा. करगणी, ता. आटपाडी), तोट्या ऊर्फ अक्षय जितेंद्र काळे (रा. करगणी, ता. आटपाडी) या टोळीला सांगली, सोलापूर व सातारा या जिल्हयातुन दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक, पंकज पवार, मिरजेचे निरीक्षक किरण चौगले, कुपवाडचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे, विट्याचे निरीक्षक धनंजय फडतरे, आटपाडीचे निरीक्षक विनय बहीर, बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, गजानन बिराजदार, पोलीस ठाणे, पोकों/अविनाश पाटील, विलास मोहिते, दादासाहेब ठोंबरे आदिनी या कारवाईत भाग घेतला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.