Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोणाला लॉटरी, कोणाला धक्का. तुमच्या शहराचा महापौर कोण? आरक्षणाची सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी

कोणाला लॉटरी, कोणाला धक्का. तुमच्या शहराचा महापौर कोण? आरक्षणाची सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी


राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडली.

या सोडतीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

आरक्षणाचे सविस्तर गणित

मंत्रालयात झालेल्या या सोडतीनुसार 29 महापालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे

अनुसूचित जाती (SC) : 3 महापालिका

अनुसूचित जमाती (ST): 1 महापालिका (कल्याण-डोंबिवली)

इतर मागासवर्गीय (OBC): ८ महापालिका

सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): १७ महापालिका

या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय गणिते बदलणार असून, विशेषतः महिला आरक्षणाने अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभागातील समीकरणे आव्हानात्मक ठरणार आहेत.


1. छत्रपती संभाजीनगर:  सर्वसाधारण  (महिला)
2. नवी मुंबई:  सर्वसाधारण
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर:  सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई:  सर्वसाधारण
8. सोलापूर:  सर्वसाधारण
9. अमरावती:   सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी  (महिला)
11. नाशिक:  सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड:  सर्वसाधारण
13. पुणे:  सर्वसाधारण
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर:  ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल:  ओबीसी
22. मीरा- भाईंदर:  सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड:  सर्वसाधारण
25. जळगाव:  ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण  (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी:  ओबीसी
विभाग महानगरपालिका आरक्षणाचा प्रवर्ग आरक्षण (महिला/खुला)
कोकण मुंबई (BMC)
ठाणे अनुसूचित जाती (SC) खुला
नवी मुंबई
कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती (ST) खुला
उल्हासनगर
मिरा-भाईंदर
भिवंडी-निजामपूर
वसई-विरार
पनवेल
पश्चिम महाराष्ट्र पुणे
पिंपरी-चिंचवड
सोलापूर
कोल्हापूर
सांगली-मिरज-कुपवाड -खुला प्रवर्ग
उत्तर महाराष्ट्र नाशिक
अहमदनगर
धुळे
जळगाव
मालेगाव
मराठवाडा छत्रपती संभाजीनगर
नांदेड-वाघाळा
लातूर अनुसूचित जाती (SC) महिला
परभणी
जालना (नवनियुक्त) अनुसूचित जाती (SC) खुला
विदर्भ नागपूर
अमरावती
अकोला
चंद्रपूर
यवतमाळ (नवनियुक्त)
वर्धा (नवनियुक्त)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.