Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रचारात राष्ट्रवादीची मुसंडी:, शाहबाज रंगारी, साक्षी बोरगावे, पार्थना शिंदे, दिग्विजय सूर्यवंशी यांना प्रभागातून प्रचंड प्रतिसाद

प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रचारात राष्ट्रवादीची मुसंडी:, शाहबाज रंगारी, साक्षी बोरगावे, पार्थना शिंदे, दिग्विजय सूर्यवंशी यांना प्रभागातून प्रचंड प्रतिसाद


सांगली :  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात मुसंडी मारली आहे. पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शाहबाज बच्चू रंगारी, प्रार्थना अमित शिंदे, साक्षी राजेंद्र बोरगावे, माजी महापौर दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा भव्य, अधिकृत आणि जल्लोषपूर्ण शुभारंभ विश्रामबाग येथील श्री गणपती मंदिर परिसरात उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे प्रमुख उपस्थित होते. श्रीगणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व उमेदवारांनी जनसेवेचा संकल्प केला. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार केला. उमेदवार साक्षी बोरगावे यांचे पती मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील हे कार्यकर्त्यांसमवेत प्रचारात आघाडीवर आहेत. 

उमेदवार शाहबाज रंगारी, प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे, दिग्विजय सूर्यवंशी यांची प्रभागातून प्रचार पदयात्रा निघाली. घरोघरी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला जात आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला मतदान करा, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढणारे नेतृत्व निवडा, असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रवादी उमेदवारांच्या विजयाच्या जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार कटिबद्ध आहेत. चारही उमेदवार तरुण आणि उच्चशिक्षित आहेत.

प्रचारामध्ये कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. घरा-घरात पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेसची विकासाची भूमिका, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या प्रचार शुभारंभाने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचा स्पष्ट संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मिळत आहे. नागरिकांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, संजय भोंसले, जयराज सगरे, अमित शिंदे, प्रा. तोहीद मुजावर, राजेंद्र कणसे, अरुण कणसे, सुभाष तोडकर, राष्ट्रवादी संघटक प्रसाद पाटील, उद्योग सेलचे अध्यक्ष संदीप पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष रवींद्र कदम, शुभम कांबळे व कार्यकर्ते, नागरिक प्रचार फेरीत सहभागी होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.