Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत मोठी खळबळ! ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

सांगलीत मोठी खळबळ! ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न


सांगली : राज्यभरात महापालिका निवडणुकींचा धुराळा सुरु आहे. प्रत्येक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी प्राचाराला लागले आहेत. प्रत्येक पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. उमेदवार घरोघरी जावून मतदारांना आपल्याला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तर नेतेमंडळी विविध शहरांमध्ये जावून प्रचार रॅलीत सहभागी होत आहे. तिथे प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारसभांमधून विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुका होत आहेत. महापालिका निवडणूक ही मिनी विधानसभा निवडणूक मानली जाते. कारण राज्यातील 29 महत्त्वाच्या शहरांमध्ये ही निवडणूक होत आहे. पण या निवडणुकीत काही अनपेक्षित घटना समोर येत आहेत. सांगलीत एका उमेदवाराच्या आईन स्वत:ला संपवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकं काय घडलं?
सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शासकीय रुग्णालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटात वादावादीचे प्रकार घडले असून पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
काँग्रेसने आरोप फेटाळले

सांगलीच्या प्रभाग 16 मधून शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमर गवंडी हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नाईक हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीतून माघारीसाठी उमर गवंडी यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याने त्यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विष प्राशन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेसकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. याबाबत पोलीस स्टेशनला कोणतेही तक्रार दाखल नसून सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.