Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शासकीय सेवेतून रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय

शासकीय सेवेतून रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय


महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याबाबत गेल्या वर्षी वित्त विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा जीआर 16 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झाला असून या जीआरनुसार एक जानेवारी 2024 पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा नवा निर्णय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू राहणार असे पण जीआर मध्ये नमूद आहे. अशा स्थितीत आज आपण जानेवारी 2024 मध्ये जारी झालेल्या या जीआरनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन वयानुसार कशा पद्धतीने वाढत जाणार याचाचा आढावा येथे घेणार आहोत.
या निर्णयानुसार वय वर्ष 80 ते 85 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 20 टक्के एवढी वाढ केली जाणार आहे. तसेच वय वर्ष 85 ते 90 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 30 टक्के एवढी वाढ करण्यात येईल असे या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद आहे.

वय वर्षे 90 ते 95 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 40 टक्क्यांची वाढ करण्यात येईल असे पण या निर्णयात स्पष्टपणे नमूद आहे. त्याचवेळी वय वर्ष 95 ते 100 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 50 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. 

महत्वाची बाब म्हणजे वय वर्ष 100 पेक्षा अधिक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 100 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शासकीय सेवेतील 80 वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक अन कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन तसेच कुटुंबनिवृत्त वेतनात करण्यात येणारी वाढ 1 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आली होती.
दरम्यान गेल्यावर्षी म्हणजेच 2024 च्या जानेवारी महिन्यात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आला. त्या शासन निर्णयात 80 वर्ष व त्यावरील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनात 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.