Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन योजना ! मिळणार 'हा' आर्थिक लाभ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन योजना ! मिळणार 'हा' आर्थिक लाभ


देशातील सर्वाधिक मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया. याच स्टेट बँक ऑफ इंडिया ने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणीही शासकीय सेवेत असेल आणि त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट असेल तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खास योजना राबवते. या अंतर्गत ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असते त्यांना एक विशेष प्रकारचे क्रेडिट कार्ड बँकेकडून पुरवले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी कर्मचाऱ्यांना एक्सप्रेस क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे एसबीआय कडून दिले जाणारे एक्सप्रेस क्रेडिट कार्ड सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ पैशांची गरज भासल्यास कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जारी केले जाते. 

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक्सप्रेस क्रेडिट कार्डधारक सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या मासिक पगाराच्या 24 पट किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होते.

म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून जे कर्ज मिळणार आहे ते कर्ज व्यक्तीच्या पगारावर डिपेंड राहणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या अंतर्गत जर कर्ज घेतलं तर किती व्याजदर लागेल. तर एक्सप्रेस क्रेडिट कार्ड मधून कर्ज घेतल्यास साधारणतः 10.05 ते 15.05 दरम्यान व्याज लागते. त्याचवेळी जे संरक्षण दलात कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना फक्त 10.50% या सवलतीच्या व्याजदर हा अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेतून कर्ज घेतल्यास किमान सहा महिन्यांपासून ते सात वर्ष किंवा रिटायर्ड होईपर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते. या योजनेतून जे एक्सप्रेस क्रेडिट कार्ड मिळते ते क्रेडिट कार्ड फक्त अशाच सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाते ज्यांचा किमान मासिक पगार हा वीस हजार रुपये आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे अकाउंट एसबीआय मध्ये आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.