नगरसेवकांना हॉटेलात धाडणाऱ्या शिंदेंची धडधड वाढली; उद्धव ठाकरेंनी मुंबईत महापौरपदासाठी सोडला बाण, म्हणाले, 'देवा'च्या मनात...
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेत तब्बल 25 वर्षांनी ठाकरेंची सत्ता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीनं उलथवून लावली. या निवडणुकीत भाजपने 89 जागा मिळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेच्या 29 जागांमुळे भाजप-शिंदेंसेना बहुमताची सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहेय. मात्र, आता अशातच उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री येथे आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सत्ता येणार की काय? या चर्चांना उधाण आलं आहे.
कारण आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री या निवास्थानी गेले होते. यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'ते आपली शिवसेना कागदावर संपवू शकतात पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही. पण त्यांची (शिंदेंची) शिवसेना फक्त कागदावर राहिली आहे हेच या निकालातून सुद्ध झालं आहे.
त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून अनेक आमिष दाखवून विविध यंत्रणांचा वापर करून गद्दार विकत घेतले. पण निष्ठावंत विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मी तुमच्या निष्ठेला मानाचा मुजला करतो, आता आपली जबाबदारी वाढली आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले. तर यावेळी त्यांनी चक्क मुंबईत आपला महापौर व्हावा हे तर आपलं स्वप्न आहेच, असं मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "मुंबईत आपला व्हावा महापौर हे तर आपलं स्वप्न आहेच, बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल, तर आकडा गाठू शकलो नाही कारण त्यांनी गद्दारी करून विजय मिळवला.त्यांनी मिळवलेला विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी मिळवला आहे. या पापाला मुंबईकर आणि मराठी माणूस कधीच माफ करू शकत नाही. त्यांनी त्यांच्या लोकांना अनेक सुविधा दिल्या. त्यांच्याकडे तन-मन आणि धन आहे पण आपल्याकडे फक्त तन आणि मन आहे धनाचा वापर आपण केला नाही. तरीही आपल्या शक्तीच्या जोरावर त्यांना घाम फोडला अशीच शक्ती कायम ठेवा", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आता एकनाथ शिंदेंची धडधड वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिदेंनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्तास्थापनेच्या दिवसापर्यंत एका फाईल्ह स्टार हॉटेलमधे नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदेंना ठाकरेंची धास्ती लागलेय की काय? अशाही चर्चा सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.