Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ, निवडणुकीत जास्त धावपळ झाल्याचा परिणाम, दिवसभरातील कार्यक्रम राखीव

Breaking News! एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ, निवडणुकीत जास्त धावपळ झाल्याचा परिणाम, दिवसभरातील कार्यक्रम राखीव


मुंबई : महाापालिका निवडणुकीत जास्त धावपळ झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम राखीव ठेवले असल्याची माहिती आहे. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे हे कॅबिनेटच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती अशी माहिती आहे. महापालिका निवडणुकीमध्ये गेल्या महिनाभरात एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यभर सभांचा धडाका लावला होता. राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये त्यांनी सभा घेतल्या. या दरम्यान झालेल्या धावपळीमुळे एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती आहे.

कॅबिनेटला गैरहजर

तब्येत बरी नसल्याने एकनाथ शिंदे आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे शनिवारी दिवसभरातील सर्व कार्यक्रम शिंदेंनी राखीव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम असल्याने अजित पवार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला येऊ शकले नसल्याची माहिती आहे.

शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 90 जागांवर उमेदवार दिले होते. यामध्ये 29 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने विजय मिळवला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी एक खास प्लॅन केला आहे. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्तास्थापनेच्या दिवसापर्यंत एका फाईल्ह स्टार हॉटेलमधे नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवले जाणार आहे.

ठाण्यात आम्ही जास्त जागा लढवल्या असत्या तर जास्त नगरसेवक निवडून आले असते असं वक्तव्य भाजप आमदार संजय केळकर यांनी केलं. ठाण्यात भाजपनं 39 जागा लढवल्या, त्यात 28 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचं निरंजन डावखरे यांनी म्हटलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.