Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील सर्वात डेंजर लग्न! वधूने बॉयफ्रेंडला घरी बोलावं अन्...; तर वराने प्रेयसीच्या पतीला...

भारतातील सर्वात डेंजर लग्न! वधूने बॉयफ्रेंडला घरी बोलावं अन्...; तर वराने प्रेयसीच्या पतीला...


प्रेम कधीही कुठेही होऊ शकतं, असं म्हटलं जातं. तसेच प्रेमाला कसलीच बंधनं नसतात असंही म्हणतात. याचाच प्रत्यय सध्या राजस्थानमध्ये झालेल्या एका खतरनाक लग्नामुळे आला आहे. आता या लग्नाला आम्ही खतरनाक म्हणतोय हे तुम्हाला खटकलं असेल. पण खरोखरच हे लग्न खतरनाक होतं असं म्हणावं लागेल. या मागील कारण म्हणजे लग्नमंडपातील वर आणि वधू या दोघांवरही खुनाचे आरोप आहेत. हे दोघेही खतरनाक आरोपी असून शिक्षा भोगत असल्यानेच आम्ही या विवाहाला खतरनाक विवाह म्हणतोय. दोघेही तुरुंगात असून तिथेच त्यांचा हा अनोखा आणि जगावेगळा विवाह सोहळा पार पडलाय.

कुठे झालं हे लग्न?

हा विवाह राजस्थानमध्ये पार पडला आहे. येथील तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या सर्वात कुप्रसिद्ध हत्याकांडातील दोन आरोपी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत विवाहबंधनात अडकले. हे दोघेही खून प्रकरणात अटकेत असून त्यांचा विवाह त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळेही चर्चेचा विषय ठरतोय हे विशेष!

वधू कोण आहे?
वधूचे नाव प्रिया सेठ आहे. तिने एका डेटिंग अॅप्लिकेशनवर दुष्यंत शर्मा नावाच्या तरुणाशी मैत्री केली. यानंतर या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु झालं. 2 मे 2018 रोजी तिने बॉयफ्रेंड दुष्यंतला तिच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले. तिथे प्रियाने त्याला ओलीस ठेवले, त्याच्या कुटुंबाकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली आणि नंतर दुष्यंतची हत्या केली. या प्रकरणामध्येच प्रिया शिक्षा भोगत आहे.
वर वधूपेक्षाही डेंजर

वराचे नाव हनुमान प्रसाद आहे. 2 ऑक्टोबर 2017 रोजी त्याने अलवरमध्ये तायक्वांडो खेळाडू संतोषच्या पतीसह पाच जणांवर चाकूने वार केले. संतोष आणि हनुमान प्रसाद यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांच्या आड येणाऱ्या संतोषच्या पतीला संपवण्याच्या उद्देशाने हनुमान प्रसादने हा प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये पाचही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातच हनुमान सध्या तुरुंगात शिक्षा भोगतोय.

असा पार पडला विवाह
प्रिया आणि हनुमान या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोघेही जयपूर मध्यवर्ती तुरुंगात आहेत. मात्र आपल्या जोडीदारासाठी थेट हत्या घडवून आणणाऱ्या हे दोघेही तुरुंगात असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या प्रियकरांना सोडून एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोर्टातून पॅरोल मिळाल्यानंतर त्यांनी 23 जानेवारी 2026 रोजी अलवरमधील एका हॉटेलमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून दोघेही अगदी सामान्य जोडप्यासारखे दिसत असून त्यांच्याकडे पाहून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अंदाज बांधणे फारच कठीण आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.