सांगली :- सांगली अन्न प्रशासनाचा जिल्यातील हॉटेल चालकांना जणू आदेश वजा तंबी देण्यात आली असल्याचे विश्वासानीय सूत्रांची माहिती समोर आली आहे. हॉटेल चालकांना 6 महिन्याचे 12000/- रुपये देण्याचा जणू आदेश लागू असल्याच समजते. जेणे करून हॉटेल चालक आपल्या हॉटेलमध्ये असे काय करतात म्हणून महिन्याचे 2000/- रुपये द्यावे लागतात.
असे लहान - मोठे जिल्यात किती हॉटेल असतील याची कल्पना नं केलेली बरी अंदाजे जिल्यात 1000 जरी लहान - मोठे असले तरी 2000/-रुपये प्रमाणे किती रक्कम या अधिकाऱ्यांकडे जमा होत असतील याची कल्पना नं केलेली बरी जर हे महिन्याचे 2000/- नाही दिले तर काहीही कारण देऊन नोटीसा देतात नोटीस आली रे आली की हॉटेल चालक घाबरून या ' साहेबाकडे ' जावेच लागते. तेथूनच खरा हिशोब चालू होतो. मग थेते सेटलमेंट खरी सुरवात होते. जर सेटलमेंट नाही झाली की मोठा दंड ठोठोवला जातो. अशी हॉटेल चालकांची व्यथा समोर येत आहे. आशा अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे कोणचेही लक्ष जात नाही. या अन्न प्रशासनाच्या आयुक्ताकडे जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी हॉटेल चालकांची आहे. खरं तर या खात्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही की कोणी हॉटेलवाले तक्रार करत नाहीत ही शोकांतिका आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष देतील का? हे पहावे लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.